What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
अँड्रॉइड 11 च्या बीटा अपडेट च्या चाचण्या नंतर शेवटी गुगल ने अँड्रॉइड 11 हे रिलीज केले. 9 सप्टेंबर रोजी गुगल ने अँड्रॉइड चे नवीनतम वर्जन रिलीज केले आहे. तुम्हाला माहीत आहे का या वर्जन मध्ये नवीन काय काय आलेले आहे? हेच मी तुम्हाला सांगणार आहे. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की अँड्रॉइड 11 मध्ये नवीन काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत? अँड्रॉइड 11 कोणत्या फोनमध्ये उपलब्ध आहे? आणि अँड्रॉइड 11 कसे डाउनलोड करायचे? चला वेळ न लावता सुरू करूयात.
अँड्रॉइड 11 मध्ये देण्यात आलेल्या नवीन सुविधा-(Features of Android 11 in Marathi)
Conservations -
हे अँड्रॉइड 1 मध्ये देण्यात आलेले सर्वात लोकप्रिय सुविधा आहे. यात आपण वापरात महत्वाच्या म्हणजेच शोषल मीडियासारख्या एप्स च्या सूचना (Notifications) वेगळ्या कॉलोम मध्ये दिसतील. तुम्हाला कोणत्या सूचनांना प्राधान्य द्यायचे किंवा कोणत्यांना नाही द्याचे ते तुम्हाला ठरवता येईल. म्हणजे सूचनांचे कॉलोम केलेले आहेत त्यात तुम्हाला ठरवावे लागेल कि कोणत्या सूचना कोणत्या कॉलोम मध्ये दाखवायच्या आहेत.
Bubbles -
अँड्रॉइड 11 मध्ये हि सुविधा देण्यात आलेली आहे. आपण कोणते दुसरे एप वापरत असलो तरीही आपल्याला कोपऱ्यात एक चॅट बबल दिसेल आणि त्याद्वारे आपल्याला आपले संभाषण चालू ठेवता येईल. म्हणजे आपल्याला चॅट करण्यासाठी व्हाट्सएप्प किंवा फेसबुक वेगळेपणाने उघडायची गरज राहणार नाही.
New Media Controls -
फोनचा आवाज नियंत्रित करण्यासाठीचे पर्याय आता नवीन डिझाईन करण्यात आलेले आहेत. आता ते नवीन पर्याय कसे आहेत ते अँड्रॉइड 11 अनुभवल्यावरच कळणार आहे. असे सांगण्यात येत आहे कि पर्याय पूर्वीपेक्षा अधिक सोपे बनवण्यात आलेले आहेत.
New Power Menu -
आपण सध्या पॉवर बटण दाबून धरल्यावर जे पर्याय येतात ते बदलण्यात आलेले आहेत. आता तुम्ही पॉवर बटण दाबून धरल्यास आधीच्या पर्यायाऐवजी पूर्णपणे बदललेले पर्याय दिसतील. यात काही असे पर्याय देण्यात आलेले आहेत कि ते वापरून आपण घरी वापरले जाणारे उपकरणे सुद्धा नियंत्रित करू शकतो.
Screen Recording -
फोन मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून एप डाउनलोड करावे लागतात किंवा काही फोन कंपनी ने दिलेले असते, परंतु आता अँड्रॉइड 11 मध्ये आधीच स्क्रीन रेकॉर्डर दिलेले आहे. म्हणजे आता तुम्हाला एप सापडायची काहीही गरज नाही.
Update -
अँड्रॉइड मध्ये काही सुरक्षेसाठी काही अपडेट्स दिले जातात ते तुम्हाला फोन मधल्या सेट्टींग्स मध्ये जाऊन डाउनलोड करावे लागतात, परंतु आता अँड्रॉइड 11 चे अपडेट्स प्ले स्टोर वर येणार आहेत. तुम्ही जसे एप अपडेट करता तसेच अँड्रॉइड सुद्धा अपडेट करता येणार आहे.
खालील स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 11 मिळणार -
Google Pixel 2
Google Pixel 2 XL
Google Pixel 3
Google Pixel 3 XL
Google Pixel 3a
Google Pixel 3a XL
Google Pixel 4
Google Pixel 4XL
Google Pixel 4a आणि OnePlus, Xiaomi, Oppo, and Realme या फोनमध्ये सुद्धा मिळणार आहे.
अँड्रॉइड 11 कसे डाउनलोड करायचे? -
तुम्ही जर अँड्रॉइड 11 साठी पात्र असलेला स्मार्टफोन वापरात असाल तर तुमच्या फोन मध्ये तुम्हाला अपडेट संबंधित सूचना मिळेल. अपडेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सेट्टींग्स मध्ये सिस्टम मध्ये जाऊन डाउनलोड करावे लागेल किंवा तुमचा फोन ऑटो अपडेट वर असेल तर ते आपोआप डाउनलोड होते आणि अपडेट इन्स्टॉल करणे तर तुम्हाला माहीत असेल.
अँड्रॉइड 11 बद्दल तुम्हाला आता माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर अजून अशी महत्वपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. तुम्हाला जर माझा हा लेख आवडला असेल तर मित्रांना पाठवणे विसरू नका आणि जर लेख संबंधित काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे मला कळवा. धन्यवाद!
good
ReplyDelete