What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्डाची आवश्यकता असते. आधार कार्ड हे भारतातल्या सर्व व्यक्तींचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. हे तुम्हाला विविध सरकारी कामासाठी वापरले जाते आणि आधार कार्ड हरवले तर काय करावे? काही लोकांना ही पद्धत माहीत नसते आणि ते घाबरून जातात. UIDAI ने आता अशी पद्धत उपलब्ध करून दिली आहे ते वापरून तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू शकता.
आधार कार्डवर एक 12 अंकी नंबर दिलेला असतो जो UIDAI द्वारा दिला जातो. तुम्हाला एकदा तो UIDAI नंबर माहिती असेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता.
मी जी पद्धत सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात मिळते. तुम्हाला ते सायबर कॅफे मध्ये जाऊन त्याची रंगीत कॉपी काढावी लागते. चला आता पाहुयात की आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?
आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?
आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार नंबर, enrollment Id(EID), virtual id(VID) यातला कोणतातरी एक नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. खाली आपण पाहू की ह्या नंबर द्वारे आधार कसे डाउनलोड करावे?
आधार नंबरवरून आधार कार्ड -
येथे दिलेले पर्याय हे ज्यांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे त्यांच्यासाठीच आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करायचे हे खाली दिलेले आहे.
1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) हे झाल्यावर तुम्हाला I have Aadhaar Number हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.
3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP बटणवर टच करा.
5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.
Enrolment (EID) नंबरवरून आधार कार्ड -
1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) हे झाल्यावर तुम्हाला I have Enrolment ID(EID) हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा EID नंबर टाकायचा आहे.
3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP बटणवर टच करा.
5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.
Virtual ID (VID) नंबरवरून आधार कार्ड -
1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) हे झाल्यावर तुम्हाला I have Virtual ID (VID) हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा (VID) नंबर टाकायचा आहे.
3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP बटणवर टच करा.
5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.
तुम्हाला जी PDF फाईल मिळाली आहे ती घेऊन जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन आणि रंगीत प्रिंट काढून घेऊ शकता.
टीप - तुमच्याकडे आधारची जी PDF फाईल डाउनलोड झालेली आहे ती उगढण्यासाठी एक पासवर्ड विचारला जाईल त्यासाठी इंग्लिशमध्ये तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षरे आणि जन्म वर्ष टाका.
उदाहरण-
नाव - RAHUL जन्म वर्ष - 2001
मग तुमचा पासवर्ड असा होईल RAHU2001
पासवर्ड टाकताना नावाचे सर्व अक्षरे मोठ्या लिपीत टाकावेत.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?
खूप लोकांनी अजून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही. अश्या लोकांना खालीलप्रमाणे जावे लागेल.
1) तुमचा आधार नंबर घेऊन जवळच्या आधार केंद्रामध्ये म्हणजेच सेतू कार्यालयात जा. तुमचे पॅन कार्ड किंवा दुसरे ओळखपत्र जवळ ठेवा.
2) तेथे तुमचे डोळ्याचे आणि बोटाचे स्कॅनिंग जेल5 जाईल.
3) मग तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची प्रिंट दिली जाईल. त्याला तुम्ही लॅमीनेशन करून घेऊ शकता.
चला मला वाटते की तुम्हाला सर्व पध्दत समजली असेल जर काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. कोणत्या मित्राला याची गरज असेल तर सोशल मीडिया द्वारे शेअर करायला विसरू नका? धन्यवाद!
हे वाचा-
Comments
Post a Comment