Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

आधार कार्डाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये - महा माहिती

     आधार कार्डचा वापर आपण सर्वांनीच केला असेल काही लोकांनी बँक अकाउंट बनवायला तर काहींनी नवीन सिम कार्ड घ्यायला कोणत्याही प्रकारे का होईना. पण खूप साऱ्या लोकांना आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती माहीत नसेल यासाठी मी हा लेख आणला आहे.
 आपण पाहिले असेल की कोणता फॉर्म भरायला, बँक अकाउंट उगढाईला, नवीन सिम कार्ड घ्यायला किंवा कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला अश्या खूप सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार कार्ड हे ओळख पत्र (ID Proof) म्हणून मागितले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण माहिती घेणार आहोत की -


अनुक्रमणिका

 • आधार कार्ड म्हणजे काय?
 • आधार कार्डसाठी पात्रता काय आहे?
 • आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
 • आधार कार्ड कसे बनवायचे?
 • आधार कार्ड तयार झाले का नाही कसे पहावे?
 • आधार कार्ड चे उपयोग काय आहेत?


 • आधार कार्ड म्हणजे काय? 

      आधार कार्ड हा UIDAI ने भारताच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला एक ओळख क्रमांक आहे. आधार क्रमांक हा 12 अंकाचा असतो यात मध्ये कुठेही अक्षरे नसतात. आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक रहिवाशी साठी आहे ते लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती सर्वानाच आधार अनिवार्य आहे. आधार कार्डवर आपले नाव, गावाचे नाव, जन्म तारीख, लिंग, आधार क्रमांक आणि कोपऱ्यात काळ्या रंगाचा बारकोड दिलेला असतो. 
      आधार कार्ड भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2009 मध्ये सुरू केले होते. UIDAI चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी एप्रिल 2010 मध्ये आधार चा लोगो जाहीर केला. आधार हा हिंदी भाषेतील शब्द आहे, या शब्दाचा अर्थ मदत किंवा समर्थन असा होतो. पंकज कुमार हे UIDAI/Aadhaar चे आताचे CEO आहेेेत. महाराष्ट्रातल्या रंजना सोनवणे या आधार मिळवलेल्या सर्वप्रथम व्यक्ती आहेत.

  आधार कार्डसाठी पात्रता काय आहे? 

       आधार कार्ड हे भारतीय नागरिकाचे ओळखपत्र आहे. भारताचा एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात राहत असेल तर तोसुद्धा आधार कार्डसाठी पात्र आहे. आधार कार्डसाठी पात्रता खालीप्रमाणे-
  1) आधारसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतात राहणारा भारतीय नागरिक आधारसाठी पात्र आहे.
  2) अर्जदार भारतात न राहणारा, परंतु भारतीय नागरिक आधारसाठी पात्र आहे.
  3) भारतात राहणारे विदेशी नागरिक सुद्धा आधारसाठी पात्र आहेत.
  4) अर्जदाराचे वय हे 3 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.

  आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

       आधार कार्ड काढण्यासाठी 3 प्रकारचे पुरावे द्यावे लागतात-
  1) ओळखीचा पुरावा (Proof of Identity)
  2) संबंध पुरावा(Proof of Relationship)
  3) जन्म तारीख पुरावा (Date of Birth)
      मी येथे लिंक देत आहे त्या लिंक वर क्लिक केल्यावर एक PDF फाईल उगढेल त्यामध्ये सर्व लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आहे. आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

  आधार कार्ड कसे बनवायचे?

      जर तुम्हाला आधार कार्ड बनवायचे आहे तर तुम्ही हे नक्कीच वाचले पाहिजे.
  1) आधार कार्ड बनवण्यासाठी सगळ्यात आधी जवळच्या Aadhaar Card Enrollment Center मध्ये म्हणजेच सेतू कार्यालयात जावे लागेल.
  2) तेथे गेल्यावर तुम्हाला तुमचा नंबर लावावा लागतो. नंबर आल्यावर तुम्हाला आत बोलावले जाते आणि तुम्हाला त्यांना कागदपत्रे द्यावे लागतात.
  3) ते झाल्यावर तुमचे डोळ्याचे आणि बोटांच्या ठष्याचे स्कॅनिंग केले जाते.
  4) स्कॅनिंग झाल्यावर आता तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. फॉर्म मध्ये किंवा तेच तुमचा फॉर्म भरतात तुम्हाला फक्त तुमची माहिती सांगावी लागते.
  5) तुमचा फॉर्म भरून आणि स्कॅनिंग झाल्यावर तुम्हाला एक पावती दिली जाते. दिलेली पावती तुम्हाला जपून ठेवावी लागते.
  6) आता तुमचे आधार कार्ड 20-30 दिवसात तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोच केले जाते आणि जर तुमचे आधार कार्ड काही कारणास्तव नाही आले तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ते डाउनलोड करू शकता.

  आधार कार्ड तयार झाले का नाही कसे पहावे?

  1) सर्वप्रथम UIDAI च्या आधिकारीक वेबसाईट uidai.gov.in वर जा.
  2) वेबसाईट वरील "My Aadhaar" सेक्शन मधील "Check Aadhaar Status" या पर्यायावर क्लिक करा.
  3) पुढे तुम्हाला विचारलेल्या जागेवर 14 अंकी  EID नंबर टाका आणि Captcha Verification पूर्ण करा.
  4) आणि चेक स्टेटस बटणवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे स्टेट्स दिसेल.

  आधार कार्ड चे उपयोग काय आहेत?

      सरकारने आधार कार्ड हे जवळपास सर्वच कामासाठी अनिवार्य केले आहे. आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. खाजगी कंपन्या किंवा बँका सुद्धा आधार कार्डशिवाय खाते उगढू देत नाहीत. तर चला आधार कार्ड चे काही उपयोग पण पाहुयात.
  1) बँकांमध्ये खाते सुरू करण्यासाठी 
  2) कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी
  3) आयकर रिटर्न भरण्यासाठी
  4) सिम कार्ड घेण्यासाठी
  5) सरकारी योजनांच्या नोंदणीसाठी
        अजून खूप साऱ्या कामांसाठी आधार कार्डची गरज लागते. आता कुठेही जायचे म्हणले तर आधार कार्ड सोबत घेऊनच जावे लागते.

      आता तुम्हाला आधार कार्डबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल असे मला वाटते. तरीपण तुम्हाला जर आधार कार्ड बनवताना काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कंमेंट द्वारे विचारू शकता. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अश्या माहितीसाठी माझ्या या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा. धन्यवाद!

इतर पोस्ट-

Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हा

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल