सरकारी नियमानुसार आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करणे सुद्धा अनिवार्य झाले आहे. आपण जर कोणता मोबाईल नंबर वापरत असाल तर त्याला आधार कार्डशी लिंक करावे लागते नाहीतर तुमचे सिम कार्ड बंद होऊ शकते.
![]() |
आधार कार्ड |
आता कोणत्याही कामासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा? तर चला वेळ न लावता पाहुयात कि आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक कसा करता येईल.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी लागणारी कागदपत्रे-
कागदपत्रे जास्त काहीही लागत नाहीत फक्त तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत न्यावी लागते आणि तुम्हाला जो फोन नंबर लिंक करायचा आहे तो नंबर आणि मोबाईल रिटेलर स्टोर ला घेऊन जायचा आहे.
हे वाचा-
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा?
आपणाला खूप वेळा कंपनी कडून संदेश आला असेल कि आपल्या जवळच्या रिटेलर स्टोरला भेट देऊन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा. आता हेच कसे करावे हे आपण पाहणार आहोत. तर चला क्रमानुसार पाहुयात कि काय करावे लागते.
१) सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या जवळच्या रिटेलर स्टोरमध्ये जायचे आहे.
२) पुढे तुमच्या मोबाईल नंबरची OTP द्वारे पडताळणी केली जाते.
३) मोबाईल नंबरची पडताळणी झाल्यावर तुमच्या अंगठ्याच्या ठशाची पडताळणी बायो मेट्रिक मशीनद्वारे केली जाते.
४) हे सर्व झाल्यानंतर २४ तासादरम्यान तुम्हाला एक कॉंफॉर्मशन संदेश येतो. कन्फर्म करण्यासाठी त्या संदेशला "Y" हे टाइप करून रिप्लाय द्या. झाले एवढेच आहे आता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक झालेला आहे.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला का नाही कसे पहावे?
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा ते आपण वरती पहिले आहे. आता आपण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला का नाही ते कसे पहावे? हे पाहणार आहोत.
१) सर्वप्रथम UIDAI च्या आधिकारीक वेबसाईट uidai.gov.in वर जा.
२) त्यानंतर My Aadhaar सेक्शन मधील Verify Email/Mobile Number वर क्लिक करा.
३) तुमच्यासमोर आलेल्या फॉर्ममध्ये तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून Captcha वेरिफिकेशन पूर्ण करा आणि Send OTP वर क्लिक करा.
४) आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP कोड येईल.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा? हे तुम्हाला सर्वांना समजले आहे तरी कोणाच्या मनात जर काही शंका असेल तर खाली कमेंट करा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा