मोबाईल वर IPL 2020 कसे पहावे? 5 पद्धती

     कोरोना रोगामुळे आलेल्या अडथळ्यांवर मात करून शेवटी IPL 2020 हे 19 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 2 ऑगस्ट रोजी IPL UAE येथे घेण्यात येणार आहे अशी घोषणा केली. UAE मध्ये IPL ठेवण्यात आले आहे. IPL च्या सगळ्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. IPL ची घोषणा झाल्यावर खूप लोक शोधत आहेत की IPL मोबाईल वर कसे पाहावे. यासाठी मी घेऊन आलो आहे IPL पाहण्याच्या 5 पद्धती ज्या तुम्हाला IPL 2020 पाहण्यासाठी मदद करतील. तर चला वेळ न लावता पाहुयात या पद्धती.
how to watch ip; on mobile 2021

मोबाइल वर IPL 2020 कसे पहावे?

     मी येथे ज्या पद्धती सांगत आहे त्यात काही फुकट आहेत आणि काहींना पैसे द्यावे लागतात. तर ध्यान देऊन वाचा आणि पोस्ट आवडली तर मित्रांना शेअर करायला विसरू नका.

1) JioTV App - (फुकटमध्ये)

     जिओ नी आपल्या मोबाईल मध्ये फुकट मध्ये TV उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर जिओ चे कार्ड वापरत असाल तर तुम्ही IPL 2020 फुकट मध्ये पाहू शकता. जिओ TV मध्ये खूप सारे चॅनेल्स उपलब्ध आहेत. खाली पहा की JioTV app मध्ये IPL फुकट मध्ये कसे पाहावे.
1) सगळ्यात आधी गुगल च्या प्ले स्टोर वरून किंवा अप्पल च्या app स्टोर वरून JioTV एप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) पुढे तुमच्या जिओ नंबर वरून JioTV वर लॉगिन करा. लॉगिन करताना लक्षात ठेवा की नंबर जिओचाच द्यायचा आहे.
3) आता स्टार स्पोर्ट चॅनेल शोधायचा आहे.
4) आता त्या चॅनेल वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुम्ही हॉटस्टार या एप वर नेले जाईल आणि तुम्ही तेथे IPL पाहू शकता.

2) Airtel TV App - (फुकटमध्ये)

     Jio TV प्रमाणे हे सुद्धा फुकटमध्ये IPL पाहण्यास परवानगी देते. तुम्हाला airtel साठी योग्य recharge करायचा आहे आणि मग तुम्हाला IPL पाहता येते. खाली पहा की Airtel TV app मध्ये IPL फुकट मध्ये कसे पाहावे.
1) सगळ्यात आधी गुगल च्या प्ले स्टोर वरून किंवा अप्पल च्या app स्टोर वरून Airtel TV एप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) पुढे तुमच्या जिओ नंबर वरून Airtel TV वर लॉगिन करा. लॉगिन करताना लक्षात ठेवा की नंबर जिओचाच द्यायचा आहे.
3) आता स्टार स्पोर्ट चॅनेल शोधायचा आहे.
4) आता त्या चॅनेल वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुम्ही हॉटस्टार या एप वर नेले जाईल आणि तुम्ही तेथे IPL पाहू शकता.

3) Disney+ Hotstar - 

     Disney+ Hotstar वर पूर्वी IPL 5 मिनिट उशिरा चालायचे परंतु आता IPL 2020 तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लाइव्ह पाहता येणार आहे. IPL लाइव्ह पाहण्यासाठी तुम्हाला हॉटस्टार चे सबक्रिपशन घ्यावे लागणार आहे. हॉटस्टार सबक्रिपशनसाठी एका वर्षाला प्रीमियम प्लॅन मध्ये 1,499 रुपये आहेत आणि दुसरा प्लॅन आहे VIP प्लॅन त्यासाठी 365 रुपये एका वर्षासाठी आहेत. चला आता पाहुत की हॉटस्टार वर IPL कसे पहावे.
1) सगळ्यात आधी गुगल च्या प्ले स्टोर वरून किंवा अप्पल च्या app स्टोर वरून Disney+ Hotstar एप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) इंस्टॉल झाल्यावर एप उगडा. तुम्हाला तुमची भाषा विचारली जाईल. तेथे तुम्हाला कोणत्या भाषेत हॉटस्टार पाहिजे ती भाषा निवडा. तुम्ही तेथे 3 किंवा 3 पेक्षा जास्त भाषा टाकू शकता.
3) पुढे आता तुम्हाला कोणते सबक्रिपशन घ्यायचे आहे ते विकत घ्या आणि पुढे "CONTINUE" या बटनवर क्लिक करा. 
4) आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यावर तुम्हाला OTP येईल.
5) पुढे तुम्हाला आलेला OTP टाकायचा आहे आणि पुढे तुमचे पैसे भरायचे आहेत.
6) आता तुम्हीं सबक्रिपशन घेतलेले आहे. आता तुम्ही IPL 2020 चा आनंद घेऊ शकता. तुम्हाला फक्त मॅच चालू झाल्यावर एप उगडाईचे आहे आणि मग घ्या IPL चा.

4) DishTV - 

     जर तुमच्याकडे DishTV चे सबक्रिपशन असेल तर तुम्ही मोबाईलवर फुकटमध्ये IPL 2020 पाहू शकता. त्यासाठी काय करावे लागते ते पहा.
1) तुम्हाला आधी DishTV एप घ्यावे लागते किंवा DishTV Anywhere या वेबसाईट वर सुद्धा जाऊ शकता. 
2) पुढे तुमचे सबक्रिपशन आहे त्या मोबाईल नंबर ने लॉगिन करा.
3) आणि ज्या दिवशी मॅच आहे त्या दिवशी स्टार स्पोर्ट्स चॅनेल लावा आणि IPL 2020 चा आनंद घ्या.

5) Tata Sky Mobile -

     Dish TV प्रमाणे टाटा स्काय वापरकर्ते सुद्धा मोबाईल वर IPL पाहू शकता. त्यासाठी टाटा स्काय ने Tata Sky Mobile हे एप उपलब्ध करून दिले आहे. चला आता पाहुत की Tata Sky Mobile या एप वर IPL कसे पाहावे.
1) सगळ्यात आधी गुगल च्या प्ले स्टोर वरून किंवा अप्पल च्या app स्टोर वरून Tata Sky Mobile एप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) पुढे तुमच्या सबक्रिपशन आहे त्या मोबाईल नंबर वर लॉगिन करा.
3) आणि ज्या दिवशी मॅच आहे त्या दिवशी स्टार स्पोर्ट्स चॅनेल लावा आणि IPL 2020 चा आनंद घ्या.

    मी तुम्हाला मोबाईल वर IPL 2020 कसे पहावे? यांच्या 5 पध्दती सांगितल्या आहेत. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कंमेंट करून कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>