फेसबुक आपण सर्वच वापरत असाल कारण फेसबुक हे जगातील सर्वश्रेष्ठ सोशल मीडिया एप्स पैकी आहे. जगभरात 2.45 अब्ज लोक फेसबुक चा वापर करतात. फेसबुक ने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अनेक सुविधा बनवल्या आहेत. फेसबुक ला माहीत आहे की पासवर्ड विसरणे हे बराच लोकांसोबत होत असते. त्याच्यासाठी फेसबुक ने तशी सुविधा सुद्धा केलेली आहे.
फेसबुक च्या अकाउंट ला सुरक्षित बनवण्यासाठी आपल्याला चांगला मोठा फेसबुक पासवर्ड टाकावा लागतो. अकाउंट मध्ये लॉगीन केल्यावर काही काळाने आपण पासवर्ड विसरतो आणि मग, अरे पासवर्ड काय होता? मी याच प्रश्नाचे उत्तर घेऊन येथे आलो आहे. आता असा विचार करू नका की आमच्या फेसबुक चा पासवर्ड याला कसा माहीत? तुमच्याच मोबाईल वरून पासवर्ड मिळवता येतो. वेळ न लावता फेसबुक चा पासवर्ड परत कसा मिळवाल? या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे ते वाचा.
फेसबुक चा पासवर्ड रीसेट कसा करावा - How to Reset Facebook Password
1) सगळ्यात आधी तुम्ही तुमचे फेसबुक उगडा. तुम्ही फेसबुक गुगल किंवा एप कोणत्याही पध्दतीने उगडू शकता.
2) फेसबुक उगडल्यावर "Forgotten Password" शब्दावर टच करा.
3) तुमच्या समोर चित्रात दाखवल्याप्रमाणे पेज येईल त्यात दिलेल्या ठिकाणी तुमचा फोन नंबर टाका. फोन नंबर टाकताना लक्षात ठेवा की जो नंबर फेसबुक अकाउंट ला लिंक आहे तोच टाकायचा आहे. आणि "Search" बटनावर टच करा.
4) तुमच्यासमोर उगडलेल्या पेजवरल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे "Next" बटनावर टच करा.
5) लगेच तुमच्या फोन वर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला एक नंबर दिलेला असेल त्याला OTP म्हणतात. तो कोड ######## च्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि कोड टाकल्यावर "Next" बटनावर टच करा.
हे वाचा-
6) पुढल्या पेज वर आता तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यावर पुन्हा "Next" बटनावर टच करा. तुमचा नवीन पासवर्ड जतन होईल. आणि पुढे "continue" बटण वर टच करा.
7) आता तुमचा पासवर्ड बदललेला आहे. आता तुम्ही तुमच्या नव्या पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करू शकता.
आता तुम्हाला फेसबुक चा पासवर्ड परत कसा मिळवाल? याचे उत्तर मिळाले असेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. आणि तुमच्या मित्राला जर याची गरज असेल तर त्याला नक्की पाठवा. धन्यवाद!
No comments:
Post a Comment