व्हाट्सअप्प हे जगातील सर्वांत लोकप्रिय मेसेंजिंग अप्स च्या यादीत आहे आणि का नसावे ते वापरणे हे इतकं सोपे आहे. तुम्हाला व्हाट्सअप्प वरून कोणाला मेसेज पाठवायचा असेल तर काय करावे लागते? फोन नंबर सेव्ह मोबाईल मध्ये करावा लागतो. मग तुम्ही त्यांना मेसेज पाठवू शकता. आणि तुम्हाला नंबर सेव्ह करायचा नसेल. तर तुम्हाला तो परत डिलीट करावा लागतो. ही पद्धत कित्येकांना किचकट वाटते.
माझ्याकडे याचे पूरक असा उपाय आहे तो मी तुम्हाला खाली सांगणार आहे. फोन नंबर सेव्ह न करता मेसेज करण्यासाठी प्ले स्टोर वर बरेच ऍप्स सुद्धा उपलब्ध आहेत परंतु ऍप्स चा उपयोग करणे टाळावे, कारण ते तुमच्या व्हाट्सअप्प सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरू शकतात. आणि ते तुम्हाला डाउनलोड करावे लागतात. तर चला बघूया फोन नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप्प मेसेज कसा करायचा?
फोन नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप्प मेसेज कसा करायचा?
1) सगळ्यात आधी तुमच्या फोनमधल्या इंटरनेट ब्राउजर, गूगल क्रोम, इत्यादी मध्ये जा.
2) ब्राउजर मध्ये गेल्यावर http://wa.me/xxxxxxxxxx हे सर्च मध्ये टाका. आणि xxxxxxxxxx च्या ठिकाणी तुम्हाला ज्या नंबर ला मॅसेज करायचा आहे तो नंबर टाका. नंबर च्या सुरवातीला 91 टाकणे विसरू नका कारण तो कंट्री कोड आहे.
3) सर्च केल्यावर तुमच्या समोर फोटोत दाखवल्याप्रमाणे येईल. तुम्हाला फक्त त्या हिरव्या बटनावर टच करायचे आहे.
4) हिरव्या बटनावर क्लिक केल्यावर तुमचे व्हाट्सअप्प उगढेल. आणि मग तुम्ही त्या नंबरला मॅसेज पाठवू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप्प वर मेसेज करू शकता. जर तुम्हाला काही अडचण असल्यास कंमेंट करून सांगा. आणि जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पाठवणे विसरू नका. धन्यवाद!
No comments:
Post a Comment