इंस्टाग्राम पासून पैसे कमवण्याच्या पाच पद्धती - महा माहिती

    आजच्या करोना च्या काळात खूप लोक हे नवीन नवीन पैसे कमावण्याच्या पद्धती शोधत आहेत. तुम्हाला माहीत आहे का काही व्यक्ती फेसबुक, इंस्टाग्राम व्हाट्सअप्प सारख्या शोषल मीडिया एप्स चा वापर करून पैसे कमवत आहेत. त्यात इन्स्टाग्रामचा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मला वाटले की मी इंस्टाग्राम पासून पैसे कसे कमवावे या बद्दल सांगितले पाहिजे.     
इंस्टाग्राम पासून पैसे कमवण्याच्या पाच पद्धती
       इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया एप आहे. जर तुम्हाला इंस्टाग्राम पासून पैसे कमवायचे असतील तर इन्स्टाग्राम चे फॉलोअर्स वाढवण्यावर चांगला भर द्या कारण तुमच्याकडे जेवढे जास्त ऍक्टिव्ह फॉलोअर्स तेवढे तुम्ही जास्त कमवू शकता. आजच्या या पोस्ट मध्ये मी इंस्टाग्राम पासून ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग दिले आहेत. तर पोस्ट ध्यानपूर्वक वाचा.

इंस्टाग्राम पासून पैसे कसे कमवावे?

1) Affiliate Marketing-

      Affiliate Marketing ही इन्स्टाग्राम पासून सर्वात चांगली पद्धत आहे. Affiliate Marketing करण्यासाठी तुम्हाला आधी कोणत्यातरी कंपनीच्या affiliate program ला जॉईन व्हावे लागते. जॉइन झाल्यावर तुम्हाला कंपनी च्या वस्तू तुमच्या इंस्टाग्राम वर टाकाव्या लागतात. त्यानंतर जर कोणी तुमच्या खात्यातून जर ती वस्तू खरेदी केली तर तुम्हाला काही टक्के commission मिळते. 

2) Promote Service-

     तुम्ही जर तुमचा युट्युब चॅनेल चालवत असाल किंवा तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर इंस्टाग्राम वापरून तुम्ही promote करू शकता. तुमच्या युट्युब च्या विडिओ ची लिंक तुम्ही इंस्टाग्राम वर टाकून तुमच्या इंस्टाग्राम च्या फॉलोअर्स ला विडिओ दाखवू शकता आणि पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामच्या bio मध्ये युट्युब विडिओ ची लिंक किंवा तुमच्या वेबसाईट ची लिंक टाकू शकता. तुम्ही पाहिलं असेल की काही इंस्टाग्राम च्या स्टोरी मध्ये पण लिंक टाकतात. पण त्यासाठी तुमचे फॉलोअर्स 10,000 असले पाहिजे. हा सुद्धा चांगला पर्याय आहे इंस्टाग्राम पासून पैसे कमावण्याचा.


3) Sale Photos-

     इंस्टाग्राम वर फोटो विकून सुद्धा पैसे कमवू शकता. जर तुम्हाला चांगली फोटोग्राफी येत असेल तर तुम्ही चांगले फोटो काढून इंस्टाग्राम वर टाकू शकता. एखाद्या कंपनी ला जर तुमचा फोटो जाहिरातीसाठी लागत असेल तर ती कंपनी तुमच्याकडून फोटो विकत घेते. किंवा तुम्ही चांगले चित्रकार आहेत. तर तुम्ही काढलेले चित्र तुम्ही इंस्टाग्राम वर टाका त्यातून तुमचे फॉलोअर्स सुद्धा वाढतील. जर तुम्हाला editing येत असेल तर तुमचे आमचे चांगले edit केलेले फोटो टाका. ते पाहून लोक तुम्हाला फॉलो करतील आणि तुम्हाला पैसे देऊन त्यांचा फोटो edit करायला देतील. ही सुद्धा चांगली पद्धत आहे.

4) Sell Product-

    जर तुम्ही कोणता गोष्टीचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही त्याची माहिती इंस्टाग्राम वर टाकू शकता. तुम्ही कोणती स्वतःची वस्तू विकत असाल तर ते इंस्टाग्राम। तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरते. तुम्ही त्याची माहिती टाकून वस्तूला इंस्टाग्राम वरून गिऱ्हाईक आणू शकता. जर तुमच्या कोणत्याही फॉलोअर्स ला ती वस्तू आवडली तर तो तुम्हाला संपर्क करणार आणि खरेदी करणार. अशा प्रकारे इंस्टाग्राम तुम्ही स्वतःची वस्तू विकून पैसे कमवू शकता.

5) Sponsor Post-

     Sponsor post करून तुम्ही इंस्टाग्राम वर पैसे कमवू शकता. तुमच्या फॉलोअर्स ची संख्या जास्त असेल तर कंपनी तुमच्या सोबत संपर्क करते आणि तुम्हाला त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला जाहिरात देते. तुम्हाला यात काही करावे नाही लागत फक्त त्यांची जाहिरात पोस्ट करायची. त्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देते. कंपनी तुमच्याद्वारे प्रचार करते आणि तुम्हाला पैसे देते. यासाठी फक्त एवढीच गरज आहे की तुमचे फॉलोअर्स ची संख्या जास्त असावी लागते.

       अश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्रामपासून पैसे कमवू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कंमेंट करून कळवा. आणि तुमच्या कोणत्या मित्रांना याची गरज असेल तर त्यांना पाठवणे विसरू नका. धन्यवाद!


1 टिप्पण्या

  1. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश. ऑनलाईन पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंग कसे करावे याबद्दल माहिती मिळेल. माझ्या वेबसाईटची लिंक http://marathikaushalya.in आपल्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने
–>