Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

ब्लॉगिंग म्हणजे काय - What is Blogging in Marathi - महा माहिती

    ब्लॉगिंग बद्दल माहिती शोधत आहात (What is Blogging in Marathi). तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये आपण ब्लॉगिंग बद्दल काही बेसिक माहिती घेऊ, जसे ब्लॉगिंग काय आहे. ब्लॉगिंग संबंधित काही नवीन शब्द पण आहेत जसे ब्लॉगर, SEO, याबद्दल सुद्धा माहिती घेऊ. जर तुमची ब्लॉगिंग करून पैसे कमवण्याची इच्छा असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. 

what is blogging in marathi, blogging in marathi

    ब्लॉगिंग बद्दल माहिती देण्याआधी तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय हे कळले पाहिजे त्यासाठी तुम्ही आमची ब्लॉग म्हणजे काय ही पोस्ट वाचू शकता.

    आपल्याकडे असलेली माहिती, आपले ज्ञान संपूर्ण जगात पोहोचवायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. (Blogging Information in Marathi) याद्वारे आज खूप लोक ऑनलाईन ब्लॉग लिहून पैसे कमवत आहेत. तर चला याबद्दल माहिती घेऊयात.

अनुक्रमणिका


ब्लॉगिंग म्हणजे काय - What is Blogging in Marathi

    एक ब्लॉग बनवणे, त्यावर पोस्ट लिहणे, ब्लॉगचे सर्व नियोजन करून त्यावरून पैसे कमावणे म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग ज्या व्यक्तीला येते तो व्यक्ती सहजपणे ब्लॉग चालवू शकतो म्हणजे त्याच्याकडे ती एक कला आहे. असे नाही की ब्लॉगिंग आपोआप समजते. त्यासाठी यूट्यूब वर माहिती मिळवावी लागते, गुगल वर शोधावे लागते, स्वतः ब्लॉग बनवून अनुभव घेवा लागतो तेव्हा ही कला अवगत होते. What is Blogging in Marathi

    ज्या व्यक्तीला ब्लॉगिंग बद्दल पुरेसे ज्ञान आहे, ब्लॉग कसा लिहायचा हे त्याला माहित आहे तो व्यक्ती सहजपणे ब्लॉगिंग करू शकतो. एक ब्लॉग काय बरेच लोक दहा-वीस ब्लॉग सुद्धा चालवतात कारण ते या क्षेत्रात अवगत झाले आहेत. ब्लॉगिंग करण्यासाठी इंग्लिश यावी लागते असेही काही नाही तुम्ही मराठी आणि हिंदीत सुद्धा ब्लॉगिंग करू शकता. 

   ब्लॉग बनवण्यासाठी आपण कोणताही विषय निवडू शकता, पण माझ्या मतानुसार तुम्ही तुम्हाला सोपा जाईल तोच विषय निवडावा. महत्वाचे म्हणजे आपल्याला वेबसाइट डिजाइन करण्याची गरज नाही, किंवा कोडींग ची सुद्धा गरज नाही.


ब्लॉगिंग संबंधित काही नवीन शब्द-

    जशी ब्लॉगिंग काहींसाठी नवीन आहे त्याप्रमाणे ब्लॉगिंग मध्ये काही नवीन घटक आहेत त्याबद्दल सर्वाना माहीत असले पाहिजे. तर चला पाहुयात ते काय आहे.


१) ब्लॉगर-

    जो व्यक्ती ब्लॉग ब्लॉग बनवतो, त्यावर पोस्ट लिहतो, ब्लॉगचे नियंत्रण करतो म्हणजेच ब्लॉगिंग करतो त्याला ब्लॉगर असे म्हणतात


२) ब्लॉग पोस्ट-

    ब्लॉग पोस्ट म्हणजे एक लेख असतो जसे तुम्ही ही ही पोस्ट वाचत आहात. प्रत्येक पोस्टला एक वेगळे नाव असते ज्याला शीर्षक (Heading) म्हणतात. सर्व पोस्टला एकत्रितपणे ब्लॉग म्हणतात.


३) SEO-

     SEO (Search Engine Optimization) हे ब्लॉगिंग मधला एक महत्वाचा घटक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सर्च इंजिन नियंत्रण म्हणता येईल.

४) कीवर्ड-

     आपल्याला गुगल वर काही शोधायचे असल्यास आपण जे टाइप करतो त्याला कीवर्ड म्हणतात. कीवर्ड हे कोणताही शब्द, वाक्य किंवा प्रश्न असू शकतो जो सर्च इंजिन वर माहिती शोधण्यासाठी वापरला जातो.


५) कीवर्ड रिसर्च-

    कोणता कीवर्ड किती वेळा, कोठून, सर्च केला जातो याची माहिती मिळवणे म्हणजे कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च करण्यासाठी इंटरनेट वर हजारो साधने उपलब्ध आहेत त्यांना कीवर्ड रिसर्च टूल असे म्हणतात.


६) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म-

     ब्लॉगिंगसाठी ज्या साधनाचा वापर करतात त्याला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणतात. सध्या इंटरनेट वर बरेच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत त्यात Blogger.com, वर्डप्रेस, Wix.com हे सध्या लोकप्रिय आहेत.


ब्लॉगिंग चे प्रकार-

     वरील माहितीवरून तुम्हाला ब्लॉगिंग कळाली असेल. तर या ब्लॉगिंग चे सर्वसाधारण पणे दोन प्रकार आहेत.
  1. Personal/ Hobby Blogging 
  2. Professional Blogging 

१) Personal/ Hobby Blogging-

     Personal Blogging म्हणजे एक छंद म्हणून केली जाणारी ब्लॉगिंग. या ब्लॉगर्स चा महत्वाचा उद्देश छंद/ आवड जोपासणे असतो, पैसे कमावणे हा त्यांचा हेतू नसतो. Personal ब्लॉगर्स हे स्वतः बद्दल सुद्धा ब्लॉग बनवतात. त्यात स्वतः विषयी लिहितात. हे ब्लॉगर्स एक ठराविक विषय निवडत नाहीत जे मनाला वाटेल ते लिहितात. यांच्यासाठी ब्लॉगिंग म्हणजे टाइम पास असते.

२) Professional Blogging-

   Professional ब्लॉगर्स चा महत्वाचा उद्देश असतो पैसे कमवणे. ब्लॉगिंग त्यांच्यासाठी व्यवसाय असतो आणि त्याद्वारे ते भरपूर प्रमाणात पैसे कमावतात. या प्रकारचे ब्लॉगर्स हे नियोजन करून ब्लॉगिंग करतात. कोणत्या पोस्ट लिहायच्या हे ते आधीच ठरवतात त्यासाठी कीवर्ड रिसर्च करतात. ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्रॅफिक आणीन कमाई करणे या हेतूने ते काम करतात.


ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कमवले जातात?

    जवळजवळ सगळेच लोक ब्लॉगिंग चा वापर पैसे कमवण्यासाठी करतात. (Earn Money from Blogging in Marathi) ब्लॉगिंग हा एक व्यवसाय झाला आहे. काही लोक फुल्ल टाइम ब्लॉगिंग करतात तर काही इतर नोकरीतून वेळ काढून ब्लॉगिंग करतात आणि पैसे कमावतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कमवले जात असतील तर ब्लॉगिंग द्वारे पैसे कमवण्याचे बरेच प्रकार आहेत. तर चला त्यावर थोडी नजर मारुयात.


१) Ad Networks-

    ब्लॉगिंग द्वारे पैसे कमावण्याची ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. ज्यादाकरून नवीन ब्लॉगर्स या पद्धतीचा वापर करतात. Ad Networks हे स्वयंचलितपणे तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दर्शवतात आणि त्या जाहिरातींवर होणाऱ्या clicks वरून तुम्हाला मोबदला दिला जातो. Google Adsense हे गुगलचे Ad Network आहे आणि सर्व नवीन ब्लॉगर्स चे आवडते सुद्धा आहे. याव्यतिरिक्त Media.net सुद्धा चांगले आहे. 

    माझ्यानुसार तुम्ही Adsense कडेच लक्ष दिले पाहिजे कारण हे गुगल च्या मालकीचे आहे आणि यातून कमाई सुद्धा चांगली होते. Google Adsense च्या जाहिराती लावण्यासाठी आधी तुम्हाला Approval घ्यावे लागते त्यासाठी काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते.

   जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल आणि तुमचे दिवसाचे traffic जर 500views एका दिवसाला यापेक्षा कमी असेल तर तुम्ही ही पद्धत वापरायला काहीही हरकत नाही. पुढे तुम्ही Google Adsense सोबत affiliate मार्केटिंग सुद्धा करू शकता.


२) Affiliate Marketing-

    ब्लॉगिंग द्वारे पैसे कमावण्याचा हा सर्वात परवडणारा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला Affiliate Programs ला जॉईन व्हावे लागते. जसे amazon affiliate program आहे, किंवा विविध होस्टिंग कंपन्या आहेत त्या Affiliate Marketing च्या सुविधा प्रदान करतात. Affiliate Marketing द्वारे तुम्ही भरपूर रक्कम कमवू शकता.

    याबद्दल अधिक माहितीसाठी Affiliate Marketing काय आहे? ही पोस्ट नक्कीच वाचा.

    तुमचा ब्लॉग जर मराठी असेल तर तुम्ही Amazon च्या affiliate मार्केटिंग ला जॉईन होऊ शकता किंवा तुमचा ब्लॉग ब्लॉगिंग शी संबंधित असेल तर होस्टिंग च्या Affiliate प्रोग्रॅम ला जॉईन होऊ शकता. 

    Affiliate Marketing मध्ये तुम्हाला काही Products विकावे लागतात त्यांची जाहिरात तुमच्या ब्लॉगवर टाकावी लागते आणि जर तुमच्या जाहिरातीवर कोणी क्लिक करून ते Product विकत घेतले तर तुम्हाला commission मिळते. अश्या प्रकारे affiliate marketing द्वारे पैसे कमावता येतात.


३) Direct Ads-

     जर तुमच्या ब्लॉगवर चांगले traffic येत असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरता येईल. Direct Ads म्हणजे एखादी व्यक्तीला किंवा कंपनीला त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे त्यासाठी ते तुम्हाला संपर्क करतात आणि त्यांची जाहिरात तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ठराविक काळासाठी दर्शवावी लागते. त्यासाठी तुम्हाला ते पैसे देतात. ब्लॉगवर रोज येणारे traffic आणि जाहिरात किती दिवस दर्शवाईची यावर रक्कम ठरवली जाते.

     Direct Ads तुम्हाला स्वतः नाही लावता येत त्यासाठी तुमच्या ब्लॉगवर चांगले traffic असले पाहिजे, तेव्हा ती कंपनी तुम्हाला संपर्क करते म्हणजे Google Adsense प्रमाणे हे नसते. गुगल Adsense आणि Direct ads एकाच वेळी सुद्धा वापरता येतात. 

    तुम्हाला जर Direct Ads लावायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर एक पेज टाकावे लागते त्यात तुमचे ब्लॉगचे daily traffic दर्शवावे लागते आणि संपर्क करण्यासाठी ई-मेल द्यावा लागतो म्हणजे कंपनीला तुम्हाला संपर्क साधता येईल. नवीन ब्लॉग असेल तर Google Adsense चांगले आहे आणि Direct Ads साठी ब्लॉगवर traffic जास्त असावे लागते. Traffic कमी असेल तर कंपनी जाहिरात देत नाही.

    याव्यतिरिक्त सुद्धा ब्लॉगवरून पैसे कमावण्याचे काही पर्याय आहेत, पण मराठी ब्लॉगर्ससाठी वरील तीन पर्याय सर्वोत्तम आहेत. याद्वारे तुम्ही भरपुर कमाई करू शकता. 


निष्कर्ष-

   आता तुम्हाला सर्वाना ब्लॉगिंग बद्दल माहिती (Blogging Information in Marathi) मिळाली असेल. तरीही अजून काही माझ्याकडून राहिले असेल तर मला कंमेन्ट द्वारे कळवा. माझ्या ब्लॉगची ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत व्हाट्सअप्प, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. (What is Blogging in Marathi) ब्लॉगिंग संबंधित अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट द्या.


ब्लॉगिंग बद्दल अधिक माहितीसाठी खालील विडिओ पहा-

अद्भुत गोष्टींबद्दल माहितकरिता आमच्या अद्भुत मराठी ब्लॉगला नक्की भेट द्या

Comments

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. महत्त्वाची माहिती दिली...👍🙏🏻

    ReplyDelete
  3. खरच उत्कृष्ट अशी अगदी मुळापासून आपण माहिती दिली आहे या लेखाद्वारे जेणेकरून नवीन व्यक्तीला सुधा ब्लोग की आहे याची संपूर्ण माहिती मिळू शकते धन्यवाद मी सुधा ब्लोग सुरुवात केलाय
    marathi ukhane

    ReplyDelete
  4. Khupch Chaan

    https://krushiyojana.in

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे