स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा - संपूर्ण मार्गदर्शन

    ब्लॉग सुरु करण्याचा विचार करत आहात? तर तुम्ही हि पोस्ट संपूर्ण वाचलीच पाहिजे.

   आजच्या युगात खूप लोक ब्लॉगिंग करत आहेत, काही आवड म्हणून करतात तर काही व्यवसाय म्हणून. (How to Start a Blog in Marathi) तुम्हीही ब्लॉगिंग करू शकता, तुमच्याकडे असलेलं ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकता आणि त्यातून भरपूर प्रमाणात कमाई करू शकता. ब्लॉग बनवणे आणि त्याला चालवणे त्याला ब्लॉगिंग म्हणतात. ब्लॉगिंग बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ब्लॉगिंग म्हणजे काय हि पोस्ट वाचू शकता. 

how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,

    "ब्लॉग कसा सुरु करावा" या पोस्टमध्ये आपण ब्लॉग सुरु करण्यासाठी काय-काय करावे लागते, ब्लॉग कशावर तयार करतात, अशी बरीच माहिती  घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हि पोस्ट संपूर्ण वाचलीच पाहिजे. 

     तर जास्त वेळ न घालवता पाहुयात "ब्लॉग कसा सुरु करावा".


 

ब्लॉग कसा सुरु करावा - संपूर्ण मार्गदर्शन 

   ब्लॉगिंग मध्ये जे नवीन आहेत, ज्यांना ब्लॉगिंग बद्दल शून्य ज्ञान आहे हि पोस्ट त्यांच्यासाठीच आहे. 
ब्लॉग बनवण्याआधी ब्लॉगसाठी एक प्लॅटफॉर्म निवडावा लागतो तर चला सर्वात पहिले यावर नजर मारू.

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे-

   इंटरनेट वर ब्लॉगिंग करण्यासाठी प्रचंड प्रमाणात साधने उपलब्ध आहेत त्यांना ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणले जाते. त्यातले काही फुकट आहेत तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. ब्लॉगर, वर्डप्रेस, wix हे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ची काही उदाहरणे आहेत. 
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
   जे ब्लॉगिंग मध्ये पूर्णतः नवीन आहेत ज्यांना ब्लॉगिंग बद्दल काहीहि माहिती नाही त्यांनी ब्लॉगर वापरायला काहीही हरकत नाही कारण ब्लॉगिंग शिकण्यासाठी ब्लॉगर हे सर्वोत्तम आहे आणि फुकट सुद्धा. तुम्ही जर वर्डप्रेस वापरायला गेलात तर तेथे तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तसे वर्डप्रेस च्या तुलनेत ब्लॉगर हे कमी पडते परंतु ब्लॉगिंग बद्दल माहिती शिवाय वर्डप्रेस घेतल्याने पैसे वाया जाऊ शकतात. How to Start a Blog in Marathi ब्लॉगिंग शिकायला वेळ लागतो तसे ३ महिने तरी लागतातच. ब्लॉगर वरचा ब्लॉग वर्डप्रेस वर सुद्धा नेता येतो.
    ब्लॉगर वर ब्लॉग बनवायचा असल्यास हि पोस्ट वाचू शकता. ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग किंवा वर्डप्रेस हेच वापरा दुसरा वापरू नका कारण हे वापरायला सोपे आहेत त्यामुळे लोकप्रिय झाले आहेत. 

ब्लॉगसाठी विषय निवडणे-

    आपणाला ब्लॉग बनवायचा आहे पण कोणत्या विषयावर? 
    ब्लॉगसाठी सर्वात आधी विषय निवडावा लागतो ज्यालाच नीचे (Niche) असे सुद्धा म्हणतात. नीचे निवडताना हे लक्षात ठेवा कि तुम्हाला त्या विषयावर लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला त्याबद्दल ज्ञान असले पाहिजे. कोणता विषय अवघड वाटत असेल तर तो निवडू नका, कारण त्या विषयावर लिहिताना अडचणी येणार. त्यामुळे विषय निवडताना काळजी घ्या. 
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
    ब्लॉगचा नीचे नुसता तुम्हाला आवडून चालत नाही तो लोकप्रिय असला पाहिजे म्हणजे लोक त्यावर सर्च करतात का नाही. जर कोणी सर्च करतच नसेल तर ब्लॉगवर ट्राफिक येणारच नाही. यासाठी कीवर्ड रिसर्च हा भाग येतो. कीवर्ड रिसर्च द्वारे तुम्हाला कळते कि कोणत्या नीचे वर किती लोक सर्च करतात.
   तुम्ही हि पोस्ट एका ब्लॉगवरच वाचत आहात. या ब्लॉगचे नाव मराठी माहिती आहे कारण मी यावर माहिती  मराठी मधून. यात तुम्हाला वरती मेनू दिसेल त्यात तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग असे पर्याय आहेत, म्हणजे हा Multi नीचे ब्लॉग आहे. जो ब्लॉग एका ठराविक विषयावर माहिती देतो त्याला सिंगल नीचे ब्लॉग म्हणतात. चला तुम्ही विषय निवडला आहे असे समजून पुढे जाऊया.

ब्लॉगचे नाव आणि डोमेन नेम-

    प्रत्येक ब्लॉगला एक नाव असते आणि एक डोमेन नेम असते. डोमेन नेम म्हणजे ब्लॉगची URL ज्यावर क्लिक केल्यावर ब्लॉग उघडतो. ब्लॉगचे नाव देताना ब्लॉगच्या विषयाला अनुसरून द्या. ब्लॉगच्या विषयात आणि नावात साम्य असले पाहिजे. ब्लॉगला स्वतःचे नाव देऊ नका. नीचे ला अनुसरून नाव द्या.
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
   आता येते डोमेन नेम, हे ब्लॉगचे नाव जे आहे तेच डोमेन नेम ठेवा. डोमेन नेम निवडताना टॉप लेवल डोमेन नेम निवडा. टॉप लेवल डोमेन नेम म्हणजे .com, .net, .in, याने शेवट होणारे डोमेन नेम. Godaddy.com वर अतिशय योग्य पैशात तुम्हाला डोमेन नेम मिळेल. तरी साधारणपणे ५००-९०० रुपया मध्ये तुम्हाला डोमेन नेम मिळून जाईल.
डोमेन नेम असे असावे  -
 • छोटे आणि सोपे असावे 
 • डोमेन नेम मध्ये संख्या नसलेले  
 • डोमेन टॉप लेवल असावे
   तुम्ही कोणतेही ब्लॉगिंग प्लॅटफॉम वापरा डोमेन नेम विकत घेतलेले चांगलेच त्याने ब्लॉग लवकर रँक होतो. ब्लॉगर मध्ये ब्लॉग बनवला तर .blogspot.com याने शेवट होणारे डोमेन फुकट मिळते, या डोमेन वर गुगल ऍडसेन्स सुद्धा मिळते, पण शक्य असेल तर कस्टम डोमेन नेम घ्या आणि कस्टम डोमेन हे टॉप लेवल डोमेनच असले पाहिजे. 

ब्लॉगची डिजाइन आणि सेटअप-

     ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ✔
     ब्लॉगचे नाव  आणि डोमेन नेम ✔
   आता येते ब्लॉग बनवणे आणि सेटअप करणे. ब्लॉग सेटअप करताना लक्षात ठेवायचे कि कोणालाही ब्लॉग वाचताना काहीही अडचण आली नाही पाहिजे. ब्लॉगचा सेटअप SEO मध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतो आणि ब्लॉग रँक होईला मदत होते. तुम्ही कोणतेही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडा सेटअप करावाच लागतो.
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
     ब्लॉग सेटअप मध्ये खालील गोष्टी कराव्या लागतात -
   वरील सर्व गोष्टी ब्लॉग बनवल्यावर कराव्या लागतात. वरील यादीत पोस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती  मिळेल. सेटअप एकदाच करावा लागतो, ब्लॉगचा सेटअप आणि डिजाइन झाले कि तुम्हाला फक्त पोस्ट लिहण्यावर, आणि ट्रॅफिक मिळवण्यावर ध्यान द्यायचे आहे. SEO Friendly पोस्ट कशी लिहिता येईल याकडे मुख्य लक्ष ठेवायचे आहे.

प्रथम ब्लॉग पोस्ट लिहिणे- 

     सर्वात आधी मी तुमचे अभिनंदन करतो कि तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्लॉग बनवला आहे.
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
आता खरे कष्ठ तुम्हाला येथे करावे लागतात. प्रथम पोस्ट लिहण्याआधी तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडेल, कि पोस्ट कोणत्या विषयावर लिहायची? कारण हा प्रश्न असा आहे जो सर्वांनाच पडतो.
याचे उत्तर मिळवण्यासाठी मी एक युक्ती सांगतो- गुगल वर तुमच्या ब्लॉगचा विषय टाका. समजा मला इतिहास या विषयावर ब्लॉग बनवायचाय ज्यात मी इतिहासाविषयी लिहिणार आहे. मग मला गुगल वर टाकले आहे "इतिहास".
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
हे पहा मला पेज च्या शेवटी काय मिळाले? याला म्हणतात Related Keywords म्हणजे आपल्या कीवर्ड शी संबंधित असलेले कीवर्ड. यातून तुम्हाला पोस्ट लिहायला विषय मिळतील. पोस्टसाठी विषय शोधण्यासाठी तुम्ही कीवर्ड रिसर्च टूल सुद्धा वापरू शकता.
पोस्ट लिहिताना हे लक्षात ठेवा-
 • पोस्ट हि कमीत कमी ५०० शब्दाची असली पाहिजे.
 • पोस्टचे शीर्षक आकर्षक असले पाहिजे.
 • पोस्ट लिहिताना असे समजा कि तुम्ही ब्लॉगच्या वाचकांशी बोलत आहात म्हणजे मी, तुम्ही अश्या भाषेत लिहा.
 • एका पोस्टमध्ये एक तरी फोटो असलाच पाहिजे. फोटो गुगल वरून कॉपी करू नका, त्यासाठी काही वेबसाईट आहेत तेथून डाउनलोड करा.
 • पोस्ट कोठूनही कॉपी करू नका त्यामुळे कोर्ट केस पण होऊ शकते.
    मला वाटते वरील गोष्टी तुम्हाला पहिली ब्लॉग पोस्ट लिहायला नक्कीच उपयोगी पडतील. अश्या प्रकारे ब्लॉगवर उत्तम दर्जाच्या पोस्ट लिहा जेणेकरून ब्लॉगवर चांगले ट्रॅफिक यायला लागेल. 

ब्लॉगवर महत्वाचे पेजेस जोडणे-

    ब्लॉग बनवल्यावर त्यावर काही महत्वाचे पेजेस जोडावे लागतात. ब्लॉग बनवल्यावर काही आढवड्यामध्ये हे पेजेस लावा किंवा सेटअप करताना लावले तरीही काही हरकत नाही. 
ब्लॉगवर जोडायचे पेजेस-
 • आमच्याबद्दल (About Us) - यात तुम्हाला ब्लॉग बद्दल थोडक्यात माहिती लिहावी लागते, जसे ब्लॉग कोणत्या विषयावर आहे, ब्लॉगचा हेतू ,ई.
 • आमच्याशी संपर्क साधा (Contact Us) - यात आपला ई-मेल द्यावा लागतो जेणेकरून व्हिजिटर ला तुम्हाला संपर्क करता येईल. यासाठी तुम्ही गुगल फॉर्म सुद्धा जोडू शकता नाहीतर काही वेबसाईट कॉन्टॅक्ट फॉर्म देतात तेथून घेऊ शकता.
 • अस्वीकरण (Disclaimer)
 • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
 • नियम आणि अटी (Terms and Conditions)
      हे पेजेस तुम्हाला इंटरनेट वर फुकट मध्ये मिळून जातील तुम्हाला स्वतः लिहायची गरज नाही. गुगल वर फक्त ***** generator असे सर्च करा आणि *****च्या जागी पेज चे नाव टाका. जर तुम्हाला ब्लॉगवर गुगल ऍडसेन्स च्या जाहिराती लावायच्या असतील तर हे पेजेस अनिवार्य आहेत. 

ब्लॉगवर ट्रॅफिक मिळवणे-

     ब्लॉग बनवला, सेटअप झाले, पोस्ट लिहिली, महत्वाचे पेजेस जोडले, आता येते ब्लॉगवर ट्रॅफिक मिळवणे.
     नवीन बनवलेल्या ब्लॉगवर ट्रॅफिक यायला वेळ लागतो तरी ६ महिने लागतात असे समजून घ्या. ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ऑरगॅनिक ट्रॅफिक जे गुगल वरून येते. ब्लॉग गुगल वर रँक होतो आणि त्यातून ऑरगॅनिक ट्रॅफिक येते.
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
    ट्रॅफिक वाढवण्यासाठी ब्लॉगची लिंक विविध ठिकाणी शेअर करावी लागते त्याला बॅकलिंक बनवणे म्हणतात. त्यावर क्लिक करून लोक तुमच्या ब्लॉगवर येतात. बॅकलिंक बद्दल अधिक माहितीसाठी खालील पोस्ट वाचा.
    सोशल मीडिया चा वापर सर्वच लोक करत असतील ते सुद्धा ब्लॉगला ट्रॅफिक मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्हाला विविध ठिकाणी अकाउंट बनवावे लागते त्यावर ब्लॉगची लिंक टाकावी लागते.
मराठी ब्लॉगसाठी उपयुक्त असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-
 • फेसबुक 
 • इंस्टाग्राम 
 • व्हाट्सएप्प 
 • कोरा 
 • ट्विटर 
    गेस्ट पोस्ट हा सुद्धा चांगला पर्याय आहे. काही ब्लॉग आहेत ते गेस्ट पोस्ट ला परवानगी देतात. तुम्हाला त्या ब्लॉगवर गेस्ट पोस्ट लिहावी लागते आणि त्यात तुम्हाला तुमच्या ब्लॉगची एक लिंक शेअर करता येते.
   ब्लॉग लिंक शेअर केल्याने ब्लॉगची डोमेन ऑथॉरिटी वाढते आणि त्याने ब्लॉग सर्च इंजिन वर लवकर रँक होतो आणि ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढते.

ब्लॉगपासून पैसे कमावणे-

    ब्लॉग बनवणे आणि पैसे कमावणे हे एक व्यवसाय आहे. ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक यायला सुरुवात झाल्यावर पैसे कमावणे सुद्धा सुरु होते. मराठी ब्लॉगपासून खूप पैसे कमावता येतात कारण सध्या मराठी ब्लॉगसाठी स्पर्धा खूप कमी आहे. मराठी ब्लॉग इंग्रजी ब्लॉगच्या तुलनेत लवकर रँक होतात. CPC कमी मिळतो पण ट्रॅफिक जास्त असते त्यामुळे कमाई सुद्धा चांगली होते.
how to start a blog marathi, blogging platform, domain name, getting traffic,
ब्लॉगपासून पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आहेत.
जसे -
याबद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कमावतात हि पोस्ट वाचा. 

निष्कर्ष-

     सर्वात प्रथम तुमचे मी ब्लॉगिंग क्षेत्रात स्वागत करतो. तुम्ही स्वतः चा ब्लॉग बनवला आहे.
    आता तुम्हाला सर्वांना ब्लॉग कसा सुरु करावा (How to Start a Blog in Marathi) याबद्दल माहिती मिळाली असेल. तरीही अजून काही माझ्याकडून राहिले असेल तर मला कंमेन्ट द्वारे कळवा. माझ्या ब्लॉगची ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत व्हाट्सअप्प, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. ब्लॉगिंग संबंधित अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट द्या. धन्यवाद!
हे वाचा -

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>