केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन पटीने वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे. केंद्र सरकारचे हे ध्येय लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन- नवीन योजना राबवण्याचे निर्णय घेतात. सध्या नुकतीच महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 (Sharad Pawar Gram Samridhi Yojana Maharashtra) ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणली आहे. आज या पोस्टमध्ये तुम्हाला शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 बद्दल संपूर्ण माहिती मराठीत मिळेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंम्बर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शरद पवार ग्रामविकास योजना 2020 राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आलेले आहे. तर चला योजनेची अधिक माहिती पाहुयात.
अनुक्रमणिका
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020- (Sharad Pawar Gram Samridhi Yojana Marathi)
NCP अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेला शरद पवार यांच्या जन्मदिनाच्या दिवशी लाँच केले गेले आहे. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 मधून शेतकऱ्याचा विकास केला जाईल आणि यातून शेतकऱ्यांना रोजगार सुद्धा प्रदान केला जाईल. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला केंद्र सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे.
"मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध" या ध्येयासाठी चार वयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून राबविण्यात येणार आहेत, यात गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार कामांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
How to apply Kisan credit card scheme online 2021?
ग्रामीण भागातील पात्र असलेल्या लाभार्थ्यांना वयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यामुळे लोकांचे स्थलांतर थांबविण्यास मदत होईल.
गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे-
ग्रामीण भागात जनावरांची गोठ्याची जागा ही अतिशय ओबडधोबड आणि खड्डयांची असते. यामुळे जनावरांना विविध आजार होतात. पावसाळ्यात जनावरांखाली पाणी साचते आणि त्यांना बसायला त्रास होतो. या अडचणीमुळे गाई व म्हशींची कास निकामी होते आणि शरीरावर जखमासुद्धा होतात. जनावरांचे शेण आणि मूत्र खतासाठी खूप महत्त्वाचे असते. ते साठवता न आल्याने वाया जाते.
या अडचणी लक्षात घेऊन या योजनेद्वारे गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधायला अनुदान दिले जाईल. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आणि जनावरे आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. गोठ्यासोबतच मूत्र साठवण्यासाठी टाकी बांधण्यात येईल. एका पक्क्या गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येतो. २ गुरे ते ६ गुरे असा एक गोठा आणि १२ गुरांसाठी दुप्पट याप्रमाणे ६ च्या पटीत अनुदान दिले जाईल.
शेळीपालन शेड बांधणे-
शेळ्या आणि मेंढ्याकरिता शेड बांधणे सुद्धा या योजनेत आहे. शेड असल्याने शेळ्या मेंढ्याचे आरोग्य चांगले राहील आणि वाया जाणारे मल, मूत्र साठवून योग्य प्रकारे खतासाठी वापरता येईल. शेळ्या मेंढ्याच्या एका शेडला ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. २ शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. एका कुटुंबाला जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान दिले जाईल.
कुक्कुटपालन शेड बांधणे-
कुक्कुटपालन हा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे. यातून पूरक उत्पादन मिळते आणि यातून शरीरासाठी पोषक आणि प्रथिने सुद्धा मिळतात, परंतु शेड नसल्याने पक्षांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शेतकऱ्याचे नुकसान होते. निवारा चांगला असल्यावर अंड्याचे आणि पिल्लांचे संरक्षण होते.
एका शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च येतो. १०० पक्षी सांभाळणार्यासाठी ही योजना लागू राहील आणि संख्या १५० च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग-
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टींग द्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात भर पडते. जमीन सुपीक होते आणि त्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होते. सेंद्रिय पदार्थात जमिनीला फायदा होणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. या योजनेत नाडेप बांधण्याची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे.
नाडेप मध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि माती चे एकावर एक थर रचले जातात आणि २ ते ३ महिन्यात कंपोस्ट वापरासाठी तयार होते. हे नाडेप बांधण्यासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च येतो. तो निधी या योजनेद्वारे उपलब्ध करून दिला जाईल.
निष्कर्ष-
चला आता तुम्हाला शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 बद्दल संपूर्ण माहिती मिळालीआहे. या योजनेची नोंदणी अजून सुरू नाही झालेली, झाल्यावर तुम्हाला येथे माहिती देण्यात येईल. तरी तोपर्यंत प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्यासाठी ही माहिती व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडियाद्वारे शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!
शेतीविषयक माहिती आणि बातम्या मिळवण्यासाठी शेतकरी ब्लॉगला भेट द्या.
पवनचक्की वीजनिर्मिती कशी करते... - Stay Updated
तूम्हाला जर मराठी मध्ये निबंध म्हणजेच essay in marathi हवे असतील तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या
Comments
Post a Comment