SEO म्हणजे काय - What is SEO in Marathi

    SEO म्हणजे काय? (What is SEO in Marathi). सर्वच नवीन ब्लॉगर ला त्रास देणारा हा विषय आहे आणि याबद्दलची माहिती नसल्यामुळे खूप नवीन ब्लॉगर्स ब्लॉगिंग सोडून देतात.

  ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्यासाठी सर्वात उपयुक्त असते SEO. जर एखाद्या ब्लॉगचा SEO चांगले नसेल तर तो ब्लॉग गुगलवर रँक होत नाही साहजिकच रँक नाही झाला म्हणजे ट्रॅफिक तर येणारच नाही.

   ब्लॉगिंगमध्ये सर्वात महत्वाचे असते उत्कृष्ट दर्जाचे आर्टिकल ब्लॉगवर लिहिता येणे आणि याप्रमाणेच महत्वाचे आहे ते आर्टिकल SEO फ्रेंडली असणे.

   SEO फ्रेंडली म्हणजे आर्टिकल चा SEO केलेला असणे. ब्लॉगवर उत्कृष्ट दर्जाची माहिती आहे म्हणजे ब्लॉग रँक होईलच असे नाही. 

  उत्कृष्ट दर्जाची माहिती आहे हे झाले ब्लॉगचा वापरकर्त्यांसाठी, व्हिजिटर्ससाठी पण सर्च इंजिन ला थोडे माहिती आहे की तुमची माहिती उत्कृष्ट दर्जाची आहे, कारण सर्च इंजिन हे एका Alogorithm वर निर्धारित असते. SEO information in Marathi या Alogorithm च्या नियमानुसार जे आर्टिकल योग्य आहे तेच रँक होते. जे ब्लॉग हे SEO चांगल्या प्रकारे करतात ते गुगल पेज च्या पहिल्या स्थानावर जागा मिळवतात. 

    आजच्या पोस्टमध्ये आपण SEO म्हणजे काय (SEO in Marathi), SEO चा फूल फॉर्म आणि याचे प्रकार कोणते आहेत हे पाहणार आहोत. याबरोबरच SEO कसे कार्य करते हे सुद्धा पाहणार आहोत. तर संपूर्ण माहितीसाठी ही पोस्ट ध्यानपूर्वक वाचा.


SEO म्हणजे काय आणि हे कसे कार्य करते - संपूर्ण माहिती 

    ब्लॉगच्या आर्टिकल किंवा वेब पेज ला सर्च इंजिन च्या पहिल्या पेजवर आणण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते तिला SEO म्हणतात. गुगल, बिंग, याहू, यांडेक्स असे काही सर्च इंजिन आहेत. गुगल हे जगातले सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे.

   समजा तुम्हाला गुगल वर SEO बद्दल माहिती हवी आहे आणि तुम्ही गुगल वर What is SEO हा कीवर्ड सर्च केला. तुमच्या समोर खूप लिंक ची यादी येईल, पण एक ठराविक पोस्ट सर्वात वरती म्हणजे Google मध्ये No1 rank दिसेल. त्या पोस्टला 1 नंबर ला येण्यामागचे कारण आहे त्या ब्लॉगमध्ये SEO चा उत्कृष्टपणे केलेला वापर आणि त्यामुळे त्या ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक येते.

what is seo in marathi, types of seo in marathi, how seo works in marathi, seo in marathi

   SEO हा ब्लॉगला सर्च इंजिन च्या पहिल्या स्थानावर आणायला मदत करतो. गुगल च्या पहिल्या स्थानावर आल्याने खूप फायदे होतात. 

  सर्च इंजिन च्या पहिल्या पेजवर लोकांचा विश्वास असतो, सर्च करणारा प्रत्येक जण पहिल्या ब्लॉगवर क्लिक करतोच म्हणजे पहिल्या स्थानावर असलेल्या ब्लॉगला Organic Traffic भरपूर प्रमाणात येते.

   Organic Traffic म्हणजे सर्च इंजिन वरून आलेले ट्रॅफिक हे सर्वात फायदेशीर असते आणि Direct किंवा Social Traffic च्या तुलनेत यातून कमाई सुद्धा जास्त होते.

 

SEO चा फूल फॉर्म काय आहे? (Full form of SEO in Marathi)

    SEO हा शब्द सर्च इंजिन शी संबंधित आहे, या शब्दाचा फूल फॉर्म "Search Engine Optimization" असा होतो. मराठीत शोध इंजिन ऑप्टिमायजेशन असे होते.


SEO चे प्रकार- (Types of SEO in Marathi)

     वरती तुम्ही पाहिले की SEO म्हणजे काय आणि SEO चा फूल फॉर्म काय होतो. आता आपण पाहू SEO च्या प्रकाराबद्दल. SEO सामान्यतः दोन प्रकारे केले जाते 

1) On-Page SEO

2) Off-Page SEO

SEO करण्याची सुरुवात ब्लॉग च्या पहिल्या पोस्टपासून करावी लागते. ब्लॉगचा सेटअप करण्यातसुध्दा SEO कडे ध्यान द्यावे लागते. ही सर्व प्रक्रिया on-page seo मध्ये येते. तर चला on-page seo बद्दल माहिती घेऊ.


1) On-Page SEO-

   ब्लॉगला सर्च इंजिन च्या दृष्टीने डिजाईन आणि सेटअप करणे याला on-page seo म्हणले जाते. 

ब्लॉगला SEO फ्रेंडली डिजाईन करणे, SEO फ्रेंडली पोस्ट लिहणे, हे सर्व On-Page SEO मध्ये येते. साईट ची डिजाईन चांगली असली की साईटला भेट देणाऱ्यावर एक वेगळाच प्रभाव पडतो आणि साईट विविध सोशल मीडियावर शेअर केली जाते म्हणजे साईट ची लोकप्रियता वाढते.

  वेबसाईट ची डिजाईन अशी बनवायची की व्हिजिटर ब्लॉगवर पुन्हा पुन्हा भेट त्याला आले पाहिजे जेणेकरून साईट चा Bounce Ratio वाढतो आणि साईट रँक होईला मदत होते. On-Page SEO हा फक्त वेबसाईट च्या मालकलाच करतो दुसरे कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

    On-Page साठी काही फॅक्टर महत्वाचे असतात. त्याकडे लक्ष दिल्यावर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे on-page seo करू शकता. 

On-Page SEO चे महत्वाचे घटक-

  • Website Speed
  • Title Tag
  • Meta Description
  • Headings
  • Image Optimization


2) Off-Page SEO-

    Off-Page SEO हा साईट चा बाहेरील भाग असतो यात साईटच्या जाहिरातीचा (Promotion) करावे लागते. जसे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे, दुसऱ्या ब्लॉगवर कंमेंट करून तिथे लिंक टाकणे यालाच बॅकलिंक बनवणे असे म्हणतात.

    साईट ची कुठेही शेअर केलेली लिंक ही बॅकलिंक असते. बॅकलिंक चे दोन प्रकार असतात-

1) No-Follow Backlink

2) Do-Follow Backlink

     SEO साठी जी बॅकलिंक महत्वाची असते ती आहे Do Follow बॅकलिंक. No follow बॅकलिंक चा SEO वर खूप कमी प्रभाव पडतो पण नवीन ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्यासाठी ह्या उपयुक्त पडतात. 

Do Follow ह्या SEO साठी खूप महत्वाच्या असतात याने Domain Authority वाढते आणि सर्च इंजिन चा साईटवरचा विश्वास वाढतो आणि साईट रँक होते आणि साईटवर चांगले ट्रॅफिक येते.

Off-Page SEO चे महत्वाचे घटक-


SEO कसे कार्य करते? (How does SEO work in Marathi?)

    आता तुम्हाला SEO म्हणजे काय आणि SEO चे प्रकार याबद्दल माहिती मिळाली आहे. पुढे आपण पाहू SEO कसे कार्य करते.

   जेव्हा आपण गुगल वर काही सर्च करतो तेव्हा आपले ध्यान सगळे पहिल्या पेजवर असते. आपण हवी असलेली माहिती पहिल्या पेजवरूनच घेतो. दुसऱ्या पेजवर शक्यतो कोणीही जात नाही. सर्च इंजिन आपल्याला उत्कृष्ट दर्जाची माहिती देत असते. हजारो लाखो साईट मधून सर्च इंजिन काही साईट निवडते आणि त्याच पहिल्या पेजवर ठेवते कारण या साईट मध्ये SEO चा खूप चांगल्या रीतीने वापर केलेला आहे.

  प्रत्येक सर्च इंजिन चा एक Algorithm असतो, त्यात सतत काही ना काही बदल होत असतात आणि हे algorithm साईट ची रँकिंग ठरवते. रँकिंगसाठी सर्च इंजिन साईट मधले काही घटक तपासते आणि त्यानुसार साईट ची रँकिंग ठरते. हे घटक गुगल ने गुपित ठेवलेले आहेत त्यामुळे कोणते घटक आहेत हे अचूकपणे सांगता येईल असे कोणीही नाही. 

   उत्कृष्ठ माहिती आणि SEO करण्याची technique जर येत असेल ना तर ती साईट सर्च इंजिन च्या पहिल्या स्थानावर येते आणि साईटवर भरभरून ट्रॅफिक येते.


निष्कर्ष- 

    तर चला आता तुम्हाला SEO बद्दल संपूर्ण माहिती (SEO information in Marathi) मिळाली आहे. जर तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका जेणेकरून या ब्लॉगचा SEO चांगला होईल आणि ही पोस्टसुद्धा गुगलच्या पहिल्या स्थानावर रँक करेल. What is SEO in Marathi पोस्ट संबंधित काही अडचण असेल तर कंमेंट करून नक्कीच विचारा आणि पोस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगा.

हे वाचा-

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा - संपूर्ण मार्गदर्शन 

ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे? 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>