E-Gopala App काय आहे, E-Gopala App ची संपूर्ण माहिती UPSC/ MPSC - महा माहिती

   केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे आणि काही एप सुद्धा बनवत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Government Exam Preparation 

  E- Gopala App हे केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लाँच करण्यात आलेले आहे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी हे खूप उपयोगी पडणारे App आहे. जनावरांचे खाद्य आणि संगोपनासाठी हे एप एक सूचना पोर्टल म्हणून काम करत आहे. पशुपालना सोबतच या एपमध्ये मत्स्यव्यवसाय सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. E- Gopala App द्वारे आत्मनिर्भर भारत अभियानातून मत्स्य संपदा योजनेला जोडण्यात आले आहे.

व्हाट्सएप्प पेमेंट काय आहे आणि याद्वारे पैसे कसे पाठवतात - महा माहिती

   आजच्या या पोस्टमध्ये आपण या E- Gopala App बद्दल माहिती घेणार आहोत. E- Gopala App म्हणजे काय आहे, E- Gopala App डाउनलोड कसे करावे, कसे वापरावे, याचे काय फायदे आहेत हे सर्व पाहणार आहोत. तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचलाच हवी.


अनुक्रमणिका

 • E- Gopala App काय आहे?
 • मोबाईल मध्ये E- Gopala App डाउनलोड कसे करावे?
 •       ई- गोपाळा एप डाउनलोड
 •       ई- गोपाळा एप नोंदणी
 • E- Gopala App कसे वापरायचे असते
 • FAQ

 • E- Gopala App काय आहे-

      E- Gopala App हे एक सूचना पोर्टल म्हणून काम करणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हे एप लाँच केले आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी हे एप सुरू केले आहे. E- Gopala App द्वारा पशुपालन आणि मस्यव्यवसाय ला डिजिटल स्तरावर उतरवण्यात आले आहे.

  what is e-gopala app in marathi

      E- Gopala App मध्ये प्राण्यांसाठी पोषक आहाराची माहिती दिली जाते. प्राण्यांना होणाऱ्या आजार आणि त्यांचे उपाय यांची माहिती दिली जाते म्हणजेच पशुपालन संबंधित सर्व माहिती या एपमध्ये काही सेकंदात तुम्हाला मिळणार आहे. सध्या या प्रकारचे कोणतेही एप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नव्हते, त्यामुळे या एप चा खूप फायदा होणार आहे.


  मोबाईल मध्ये E- Gopala App डाउनलोड कसे करावे-

     

  ई- गोपाळा एप डाउनलोड -

  १) E- Gopala App हे गुगल प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहे.

  २) डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर "E- Gopala App" असे सर्च करा तुम्हाला एप मिळेल.

  ३) किंवा जर एप नाही मिळाले तर येथे क्लिक करून एप डाउनलोड करा.


  ई- गोपाळा एप नोंदणी -

  १) डाउनलोड झाल्यावर एप तुमच्या फोन मध्ये इंस्टॉल होईल. सर्वात पहिले ते एप उघडा.

  २) आता नोंदणी करण्यासाठी Register Here वर क्लिक करा.

  ३) Terms and Conditions साठी accept वर क्लिक करा.

  ४) आता तुमचे State, District, Tahsil आणि Village निवडा.

  ५) पुढे तुमचे नाव, जन्म तारीख, Gender, मोबाईल नंबर आणि पत्ता टाका.

  ६) आता तुमच्या मोबाईल वर आलेला OTP क्रमांक टाका आणि सेव करा. आता तुमची नोंदणी झालेली आहे.


  E- Gopala App कसे वापरायचे असते -

     ई- गोपाळा मध्ये नोंदणी झाल्यावर सहा महत्वाचे पर्याय दिसतात ते खालीलप्रमाणे-

  १) PASHU POSHAN- हा पर्याय वापरून शेतकरी गाय, म्हैस साठी उत्तम आहाराचे नियोजन करू शकतो. यात तुमच्याकडे असलेल्या जनावरांची माहिती द्यावी लागते. जर तुम्हाला हा पर्याय वापरायला अडचण येत असेल तर एप मध्ये खाली विडिओ पण दिलेला आहे.

  २) AYURVEDIC VETERINARY AND MEDICINE- जनावरांना होणारे आजार व त्यांच्या आयुर्वेदिक उपचार याची माहिती या पर्यायात देण्यात येत आहे. यात तुम्हाला फक्त जनावरांना झालेला आजार निवडायचा आहे आणि एप तुम्हाला त्या आजाराचा आयुर्वेदिक उपचार सांगणार आहे.

  ३) MY PASHU AADHAAR- जर तुम्ही जनावरांचे विमा किंवा आधार बनवले असेल तर त्याचा नंबर टाकून येथे माहिती घेऊ शकता.

  ४) MY ALERTS- या पर्यायात शेतकऱ्यांना जनावरां संबंधित नवीन आहाराची गरज किंवा नवीन योजना असेल तर यातून सूचना मिळते.

  ५) EVENTS- जर तुमच्या जवळच्या भागात जर कृषी संबंधित कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असेल तर यातून तुम्हाला सूचना मिळते.

  ६) PASHU BAZAAR- पशु बाजार या पर्यायामध्ये जनावरांची विक्री व खरेदी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.


  FAQ-

  प्रश्न - ई-गोपाळा एप कोणी लाँच केले?
  उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

  प्रश्न - ई-गोपाळा एप केव्हा लाँच केले?
  उत्तर - २० सप्टेंबर २०२० (बिहार)

  प्रश्न - ई-गोपाळा एपचा वापर कोण करू शकते?
  उत्तर - पशु पालन करणारे आणि मस्य पालन करणारे 

  प्रश्न - ई-गोपाळा एप कोठून डाउनलोड करावे?
  उत्तर - गुगल प्ले स्टोर 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>