नवीन PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे मागवावे - महा माहिती

    आधार कार्ड आपण सगळेच वापरत असणार कारण आज सर्व कामांसाठी आधार कार्ड ची गरज लागते. कोठेही जाताना आधार कार्ड सोबत ठेवावे लागते. तुम्हाला माहीतच असेल कि आधार कार्ड हे साध्या कागदापासून बनवलेले आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांनी आधार कार्डला प्लास्टिक लॅमिनेशन सुद्धा करून घेतले असेल, कारण कागदाचे आधार कार्ड खराब होऊ शकते, त्यात पाणी जाते किंवा दुमडले जाते. आधार कार्ड सुरक्षितपने राहावे आणि हाताळता यावे यासाठी सरकारने PVC आधार कार्ड देण्याची घोषणा केलेली आहे. 

pvc aadhaar card online order in marathi

   आजच्या या पोस्ट मध्ये आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवावे हे पाहणार आहोत. नवीन PVC Aadhaar Card हे ATM कार्डसारखेच असणार आहे आणि हे मागवण्यासाठी सरकारकडून 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्याला PVC आधार कार्ड घरपोहोच मिळणार आहे. तर आता आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवायचे याची पद्धत पाहणार आहोत.


नवीन PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे मागवावे?

    PVC आधार कार्ड मागवायची ऑनलाईन पद्धत खालीलप्रमाणे-

१) सर्वप्रथम UIDAI च्या अधिकारीक वेबसाईट https://uidai.gov.in/ ला भेट द्या.

pvc aadhaar card online marathi order

२) आता My Aadhaar मधील Order Aadhaar PVC Card यावर क्लिक करा किंवा डायरेक्ट https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint.php या वेबसाईटला भेट द्या. 

pvc aadhaar card online marathi order

३) तुमच्या आधार कार्डचा नंबर, Virtual ID, EID यापैकी जो असेल तो योग्य ठिकाणी टाका.

pvc aadhaar card online marathi order

४) खाली दिलेला Security Code दिलेल्या जागेवर योग्य टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

५) जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर My Mobile number is not registered वर क्लिक करा आणि खाली तुमच्या जवळ असलेला नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

pvc aadhaar card online marathi order

६) आता तुम्हाला OTP येईल तो योग्य ठिकाणी टाका आणि तुम्हाला आधार कार्डची कॉपी दिसेल.

७) पुढे पेमेंट चा पर्याय निवडून ५० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा.

८) पेमेंट झाल्यावर तुमचे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.


     आता तुम्हाला Online PVC Aadhaar Card मागवायची पद्धत समजली असेल. जर तुम्हाला Online PVC आधार कार्ड मागवताना काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका.

आपले आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल? या बद्दल माहिती साठी योगा टिप्स ब्लॉगला भेट द्या.

ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत - महा माहिती 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना २०२१ - महा माहिती 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>