Signal App म्हणजे काय आहे - Signal App डाउनलोड आणि कसे वापरावे - महा माहिती

 Signal App म्हणजे काय आहे (What is Signal App in Marathi?) सध्या हे एप खूप लोकप्रिय झाले आहे.

    Signal या एप बद्दल तुम्ही कोठेतरी ऐकले असेल कारण व्हाट्सअप्प च्या नवीन गोपनीयता धोरणामुळे वापरकर्ते नवीन एप च्या शोधात आहेत. यामुळेच हे Signal App समोर आले आहे. व्हाट्सअप्प चे गोपनीयता धोरण वापरकर्ते ना आवडलेले नाही त्यामुळे लोक आता व्हाट्सअप्प वापरायचे बंद करत आहेत. 

signal app kya hai marathi download

    ज्यांना व्हाट्सअप्प चे नवीन गोपनीयता धोरण मान्य नाही त्यांना त्यांचे खाते बंद करावे लागेल असे व्हाट्सअप्प चे म्हणणे आहे. यामुळे Signal App ची लोकप्रियता वाढली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Signal App बद्दल माहिती घेणार आहोत. Signal App चे फीचर्स, इतिहास, हे सर्व आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.


Signal App म्हणजे काय आहे - What is Signal App in Marathi

    Signal हे एक व्हाट्सअप्प सारखे encrypted मेसेंजिंग एप आहे. इंटरनेट चा वापर करून मेसेज पाठवणे आणि ऑडिओ/ विडिओ कॉल करण्याची सुविधा या एप मध्ये देण्यात आलेली आहे. या एपमध्ये ग्रुप चॅट आणि विडिओ ग्रुप चॅट ची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे. Signal App हे त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहे.

     Signal App जवळपास व्हाट्सअप्प सारखेच आहे. Signal App वापरकर्त्याचा डेटा सर्व्हर मध्ये साठवून ठेवत नाही आणि डेटा चा वापर कोठेही करत नाही. याच कारणामुळे सिग्नल एप ला प्रसिद्धी मिळालेली आहे. आता तुम्हाला सिग्नल एप बद्दल माहिती मिळालेली आहे, पुढे आपण या एप चा इतिहास पाहुयात.


व्हाट्सएप्प पेमेंट काय आहे आणि याद्वारे पैसे कसे पाठवतात - महा माहिती


Signal App इतिहास - Signal App History

   Signal App चा शोध Moxie Marlinspike यांनी लावला आहे. Moxie Marlinspike यांनी त्यांच्या स्वतः च्या Whisper Systems या कंपनीमार्फत 2010 मध्ये हे एप लाँच केले होते. 

    पुढे Moxie Marlinspike आणि Brian Acton यांनी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी Signal Foundation ची स्थापना केली. तुम्हाला माहीत नसेल की Brian Acton हे व्हाट्सअप्प चे Co- Founder आहेत.            व्हाट्सअप्प चे नवीन गोपनीयता धोरण आल्यावर Brian Acton यांनी Signal Foundation ला ३५० करोड रुपयांची इनिशीयल फंडिंग केली आहे.

   Signal App हे Android, Windows, IOS आणि Mac या सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि सहजपणे डाउनलोड करता येते.


Signal App चे फीचर्स -

   Signal App हे एक मेसेंजिंग App आहे. यात भरपूर फीचर्स दिलेले आहेत. Signal App मध्ये काही असे फीचर्स आहेत की ते इतर कोणत्याही मेसेंजिंग एप मध्ये नाहीत. येथे आपण Signal App मध्ये असलेल्या काही विशिष्ट फीचर्स बद्दल माहिती घेऊ.


१) View Message Details-

    Signal App मध्ये आपण मेसेज चे डिटेल्स पाहू शकतो. जसे मेसेज डिलिव्हर झाला का नाही, मेसेज वाचला की नाही आणि मेसेज चा वेळ ही सर्व माहिती सिग्नल app वर पाहता येते.


२) Delete for Everyone-

    चुकून पाठवलेल्या मेसेज दोन्ही फोनमधून डिलीट करण्यासाठी हे फीचर आहे. हे फीचर व्हाट्सअप्प मध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे. काही वेळा आपल्याकडून चुकून मेसेज पाठवला जातो तो हटवण्यासाठी हे Delete for Everyone फीचर देण्यात आलेले आहे.


३) Theme Options-

     Signal App मध्ये थीम बदलायचा पर्याय सुद्धा दिलेला आहे. या एपमध्ये २ थीम दिलेल्या आहेत एक डार्क थीम आणि दुसरी लाईट थीम. सेट्टींग्स मध्ये Appearance पर्यायमध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे.


४) Language Options-

     Signal App मध्ये launguage बदलण्याचा पर्यायसुद्धा आहे. यात English, Hindi आणि अजून ७० भाषा देण्यात आलेल्या आहेत ज्या कोणत्याही भाषिक यूजर ला वापरण्यास मदत होईल. भाषा बदलण्यासाठी Signal App च्या सेट्टींग्स मध्ये Appearance यात launguage हा पर्याय दिलेला आहे.


५) Signal PIN-

    Signal PIN हे फिचर फक्त सिग्नलएप मधेच देण्यात आलेले आहे. इतर कोणत्याही एप मध्ये हे उपलब्ध नाही. Signal PIN हा एक असा कोड असतो जो वापरून तुम्ही तुमचे अकाउंट परत कोणत्याही फोनमध्ये मिळवू शकता म्हणजे रिकवर करू शकता.


६) Font Size Option-

     काही व्यक्तींना बारीक अक्षरे वाचायला त्रास होतो त्यासाठी हा ऑपशन उपयोगाचा आहे. यात तुम्हाला फॉन्ट आणि फॉन्ट ची साईझ बदलता येईल.


७) Typing Indicator-

     व्हाट्सअप्प प्रमाणे सिग्नल मध्ये सुद्धा टायपिंग इंडिकेटर दिलेले आहे. जर समोरचा व्यक्ती काही टाइप करत असेल तर व्हाट्सअप्पमध्ये typing... असे दिसते, परंतु सिग्नल मध्ये खूप सुंदर टाइपिंग इंडिकेटर दिलेले आहे. हे इंडिकेटर बंद आणि चालू सुद्धा करता येते.


८) Group QR Code/Link-

     Signal App मध्ये बनवलेल्या ग्रुप मध्ये लोकांना ऍड करण्यासाठी Invite link चा पर्याय दिलेला आहे आणि याबरोबरच QR कोड स्कॅन करून जॉईन होईचा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे.


सिग्नल App डाउनलोड कसे करावे- Signal App Download

    सिग्नल एप सर्व App स्टोर वर फुकट मध्ये उपलब्ध आहे, तुम्ही कधीही तुमच्या अँड्रॉइड किंवा IOS डिव्हाइस वर एप डाउनलोड करू शकता. 

    "Signal App" हे App स्टोर किंवा प्ले स्टोर वरती सर्च करा तेथे तुम्हाला app मिळेल ते डाउनलोड करा. 


निष्कर्ष-

    आता तुम्हाला सिग्नल एपबद्दल संपूर्ण माहिती मिळाली आहे. तरीही काही शंका तुमच्या मनात राहिली असेल तर कंमेंट करून नक्की विचारा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

ई- गोपाळा ऍप्प काय आहे आणि याचे फायदे कोणते आहेत- महा माहिती 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>