व्हाट्सएप्प पेमेंट काय आहे आणि याद्वारे पैसे कसे पाठवतात - महा माहिती

    संपूर्ण जगात अत्यंत लोकप्रिय असलेल्या मेसेंजिंग एप व्हाट्सअप्प ने नुकतेच एक नवीन फिचर जाहीर केले आहे. ज्याच्या मदतीने व्हाट्सअप्प उपभोगता व्हाट्सअप्प वरूनच पैश्याची देवाणघेवाण करू शकतील. आपण व्हाट्सअप्प वरून जसे कोणाला मेसेज पाठवता तसेच आता तुम्हाला पैसे पाठवता येणार आहेत. व्हाट्सअप्प ने NPCI (National Payment Corporation of India) च्या सहयोगाने हे फिचर बनवले आहे. या फिचर ला व्हाट्सअप्प पेमेंट्स असे संबोधले जाते. 

व्हाट्सअप्प पेमेंट काय आहे? व्हाट्सअप्प वरून पैसे कसे पाठवायचे?

    व्हाट्सअप्प चे हे फिचर सध्या सर्व मोबाईल मध्ये आलेले नाही, थोड्याच दिवसात हे सर्वांच्या मोबाईल वर येणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हाट्सअप्प पेमेंट काय आहे? आणि त्यानंतर आपण पाहू की व्हाट्सअप्प च्या मदतीने पैश्याची देवाणघेवाण कशी करावी. त्यासाठी तुम्हाला आधी काही सेट्टींग्स कराव्या लागतात त्यासुद्धा आपण पाहू. तर चला मग जास्त वेळ न घालवता पाहुयात की व्हाट्सअप्प वरून पैशाची देवाणघेवाण कशी करावी. व्हाट्सअप्प पेमेंट कसे मोबाईल मध्ये घ्यायचे ते सुद्धा आपण पाहू.

हे वाचा-

Signal App म्हणजे काय आहे - Signal App डाउनलोड आणि कसे वापरावे - महा माहिती

New Features of Android 12 - Facts Forest

व्हाट्सएप्प वरून पैसे कसे पाठवतात - महा माहिती

     व्हाट्सअप्प पेमेंट हे in-chat पेमेंट सुविधा आहे, याच्या सहाय्याने व्हाट्सअप्प उपभोगता व्हाट्सअप्प वरून पैश्याची देवाणघेवाण करू शकतात. ही UPI आधारित पेमेंट सुविधा आहे. या सुविधेचा वापर करून तुम्ही जसे व्हाट्सअप्प वरून मेसेज पाठवता तसेच आता तुम्हाला पैसे पाठवता येणार आहेत. in-chat सुविधा म्हणजे ही सुविधा chatting बॉक्स मध्ये आहे आणि हे लक्षात ठेवा की व्हाट्सअप्प पेमेंट हे काही वेगळे एप नाही ही सुविधा व्हाट्सअप्प मधेच देण्यात आलेली आहे हे वेगळे एप नाही.


व्हाट्सअप्प पेमेंट चे फायदे-

१) व्हाट्सअप्प संपर्क यादीतल्या कोणालाही आणि केंव्हाही पैसे पाठवता येतात.

२) व्हाट्सअप्प मेसेज पाठवण्यासारखे अत्यंत सोपे

३) बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड विचारायची गरज नाही.

४) पैसे पाठवल्यावर व्हाट्सअप्प सूचना सुद्धा येते.


व्हाट्सअप्प पेमेंट सेटअप कसे करावे?

    व्हाट्सअप्प द्वारे पैसे पाठवण्याआधी काही सेटअप करावे लागते जसे बँक अकाउंट जोडावे लागते आणि त्याची पडताळणी सुदधा करावी लागते. हे कसे करावे ते मी खाली दिलेले आहे.

१) सर्वात आधी मोबाईल वरून किंवा संगणकावरून व्हाट्सअप्प चालू करा.

२) आता वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा आणि त्यात Payments पर्यायावर क्लिक करा.

whatsapp payment procedure

३) पुढे Add Payment Method वर क्लिक करा.

whatsapp varun paise pathvne

४) तुमचे अकाउंट ज्या बँकेत आहे ती बँक निवडा. (बँक अकाउंट ला व्हाट्सअप्प नंबर लिंक असायला हवा.) 

select bank account nivad kara

५) Verify via SMS पर्याय निवडून OTP फोन नंबर ची पडताळणी पूर्ण करा.

phone number verification padatalni

६) सर्व प्रक्रिया झाल्यावर Accept and Continue पर्यायावर क्लिक करा.

Accept and Continue
७) आता  तुमचे व्हाट्सएप्प पेमेंट सेटअप झालेले आहे. पैसे कसे पाठवायचे त्यासाठी खाली पहा.


व्हाट्सअप्प वरून पैसे कसे पाठवायचे?

     व्हाट्सअप्प वरून पैसे पाठवण्याच्या दोन पद्धती आहेत दोन्हीही आपण पाहू.


पद्धत १- 

१) ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅट मध्ये जा.

२) खाली असलेल्या Attachment पर्यायावर क्लिक करा.

whatsapp peyment option marathi

३) जर समोरच्या व्यक्तीचे पेमेंट सेटअप झालेले असेल तर तुम्हाला Payment हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

४) तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत ती संख्या टाका.

५) तुमचा UPI (४ अंकी) पिन टाका जो तुम्ही ATM साठी वापरात असता. 

६) पिन टाकल्यावर सेंड बटन वर क्लिक करा.


पद्धत २-

१) व्हाट्सअप्पच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा.

२) जर तुम्हाला QR code द्वारे पैसे पाठवायचे असतील तर तेथे QR code दिलेला आहे.

३) खालच्या बाजूला असलेल्या New Payment पर्यायावर क्लिक करा.

४) पैसे पाठवायचे आहेत तो संपर्क निवडा किंवा Send to UPI ID किंवा Scan QR जे तुम्हाला सोयीस्कर असेल ते निवडा.

५) आणि पुढील पद्धत वरती पद्धत १ मध्ये दिलेली आहे.


व्हाट्सअप्प पेमेंट सुविधा कशी मिळवावी?

    व्हाट्सअप्प पेमेंट सुविधा मिळवण्यासाठी व्हाट्सअप्प हे सतत प्ले स्टोर वरून अपडेट करत राहा. अपडेट जाहीर झाल्यावर तुमच्या मोबाईलवर येईल आणि मग तुम्ही ही सुविधा वापरू शकता.


निष्कर्ष-

    व्हाट्सअप्प वरून पैसे कसे पाठवायचे ते मी सांगितले आहे. तरीही तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही कंमेंट करून विचारू शकता. मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हाट्सअप्प किंवा इतर सोशल मीडिया द्वारा मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.


हे वाचा-

फोन नंबर सेव्ह न करता व्हाट्सएप्प मेसेज कसा करावा?

इंस्टाग्राम पासून पैसे कमावण्याच्या ५ पद्धती 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>