भारतात अनेक जाती- धर्माचे लोक राहतात. भारत हा एक असा देश आहे त्याचे अनेक नावे आहेत. जगातील काही देशात भारताला इंडिया नावाने ओळखले जाते तर काही देशात हिंदुस्तान नावाने ओळखले जाते. आपल्या देशाला हे नाव कसे पडले आणि कोणी ठेवले हे कित्येक जणांना माहीत नसेल. भारताला फक्त इंडिया, हिंदुस्तान आणि भारत नाही तर अजूनही काही नावे आहेत.
जगातल्या सर्वात प्राचीन देशांमध्ये भारत एक आहे. आपल्या देशाचा इतिहास खूप जुना असल्याने देशाला अनेक नावे मिळाली आहेत. जगातील मोठं-मोठे देश जसे अमेरिका, चीन, रशिया, ई देशांत भारताला इंडिया या नावानेच ओळखले जाते. आजच्या या लेखामध्ये आपण या इंडिया नावाचा इतिहास जाऊन घेणार आहोत. सामान्य ज्ञानासाठी आपल्याला ही माहिती उपयोगी ठरू शकते, त्यासाठी लेख संपूर्ण वाचवा अशी विनंती !
भारताला इंडिया हे नाव कसे पडले?
आपल्यातल्या अनेकांना वाटत असेल की भारताला इंग्रजी मध्ये इंडिया म्हणतात, परंतु इंडिया हे भारताचे इंग्रजी नाव नाही. इंडिया हा शद्ब दुसरीकडुन आलेला आहे. इंडिया हा शब्द सिंधू नदी पासून आला आहे. सिंधू नदी ही भारतातील एक प्राचीन नदी आहे. जगातील मोठं-मोठ्या नद्यांमध्ये सिंधू नदी चा समावेश आहे. ही नदी भारत, पाकिस्तान, चीन या तीन देशांच्या जमिनीवरून वाहते. इंडिया नावाचा उदय याच नदीपासून झालेला आहे.
सिंधू नदी ला संस्कृत मध्ये सिंधू म्हणतात आणि इंग्रजी मध्ये इंडस असे म्हटले जाते. इंग्रज 1800 दरम्यान मध्ये भारतात आले, त्या काळात भारताला हिंद किंवा हिंदुस्तान म्हटले जायचे. इंग्रजांना हिंदुस्तान शब्द बोलायला कठीण जात असे, त्यामुळे इंग्रजांनी इंडस या नावाच्या आधारावर भारताला इंडिया म्हणायला सुरू केले. इंडस हे सिंधू नदीचे इंग्रजी नाव आहे.
इंग्रजांच्या काळात इंडिया हे नाव खूप लोकप्रिय झाले. सर्व इंग्रज लोक भारताला इंडिया म्हणू लागले. जगातल्या बऱ्याच देशात इंडिया नाव प्रचलित झाले. या नावांच्या लोकप्रियतेमुळे भारतात राहणाऱ्या लोकांना इंडियन्स हे नाव पडले. भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारताच्या संविधानात इंडिया नावाचा स्वीकार करण्यात आला आणि हे नाव जगात सर्वत्र पसरले.
भारताचे सर्वात प्राचीन नाव "आर्यवर्त" आहे. अनेक प्राचीन कथा, पुराण मध्ये भारताच्या अनेक नावांचा उल्लेख आहे. सद्याच्या काळात भारताची तीन नावे प्रसिद्ध आहेत, 1) भारत, 2) इंडिया, 3) हिंदुस्तान. सर्व ठिकाणी भारताला या तीन नावाने ओळखले जात आहे.
भारताच्या नावावर प्रश्नोत्तरे-
तर चला, आता आपल्याला भारताला इंडिया का म्हणतात या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे अशी मी आशा करतो. आपल्याला हा लेख वाचुन जर नवीन काही माहिती मिळाली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
या लेखसंबंधीत जर काही अडचण किंवा शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की विचारा. आजचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. या प्रकारच्या अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट द्यायला विसरू नका.