JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Friday, 9 July 2021

जिओ कॉलर ट्यून सेट कशी करावी- How to Set Jio Caller Tune?

     जिओ कंपनीने आपल्या युजर्स साठी फ्री मध्ये Caller Tunes उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जर आपण Jio SIM Card वापरत असाल तर आपल्याला फ्री मध्ये Jio Caller Tune लावता येणार आहे.

How to Set Jio Caller Tune
    आज आम्ही आपणास जिओ कॉलर ट्यून कशी Active करायची हे सांगणार आहोत. जिओ Caller Tune लावण्यासाठी आपल्या Jio SIM मध्ये Unlimited Plan असणे गरजेचे आहे. तर चला जास्त वेळ न लावता Jio Caller Tune Active करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात.

जिओ कॉलर ट्यून सेट कशी करावी- How to Set Jio Calller Tune?

    जिओ मध्ये Caller Tune सेट करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पध्दतीने Jio Savaan App द्वारे आपण Caller Tune सेट करू शकतो आणि दुसरी म्हणजे SMS द्वारे जिओ ट्यून सेट करणे. 
या लेख मध्ये आपल्याला दोन्हीही पध्दतीच्या Steps सांगितल्या आहेत.

Jio Savaan App वरून कॉलर ट्यून सेट करणे-

1) सर्वात आधी, जर आपल्या SmartPhone मध्ये Jio Savaan App नसेल तर Google Pay Store वरून डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्यावे.
2) इंस्टॉल केल्यावर आपल्या Jio Number द्वारे नोंदणी करून लॉगिन करावे आणि App उघडावे.
3) आता आपणास Screenshot मध्ये दाखवल्या प्रमाणे Jio Tunes पर्यायावर क्लिक करायचे आहे.

4) आपल्याला Jio Caller Tune जोडायचे असलेले गाणे निवडा, किंवा सर्च करा.
5) आपले गाणे निवडल्यावर तेथील तीन उभे डॉट असलेल्या पर्यायावर क्लिक करा.

6) पुढे एक Conformation संदेश येईल तेथे Set JioTune वर क्लिक करायचे आहे.

7) आपल्याला स्मार्टफोन मध्ये संदेश द्वारे एक मेसेज येईल. आता आपल्या SIM ला Jio Caller Tune सेट झाली आहे.

SMS द्वारे Jio Caller Tune सेट करणे-

1) SMS पाठवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोबाईल च्या संदेश बॉक्स मध्ये जायचे आहे.
2) आता संदेश बॉक्स मध्ये JT हा शद्ब टाइप करून 56789 या नंबर वर SMS पाठवायचा आहे.
3) हे झाल्यावर आपल्याला गाणे निवडायचे आहे, गाण्याची Category निवडण्यासाठी खालील नंबर Reply म्हणून पाठवायचा आहे.
Bollywood साठी 1
Regional साठी 2
International साठी 3
आपण आपले आवडीचे गाणे निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. आणि Jio Caller Tune सेट करावी.

Jio Caller Tune बंद कशी करावी?

    जिओ कॉलर ट्यून Deactivate करण्यासाठी आपल्याला 56789 या नंबर वर एक संदेश पाठवायचा आहे.
संदेश खालीलप्रमाणे- STOP
    किंवा आपण 155223 या नंबर वर Call करून सुद्धा Jio Caller Tune बंद करू शकता.

निष्कर्ष-

    आता आपण Jio SIM ला Caller Tune सेट करण्याची प्रक्रिया पाहिली आहे. वरील स्टेप्स फॉलो करून आपण आपल्या Jio Number वर आपली आवडती Caller Tune सेट करू शकता.
     आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका आणि Caller Tune सेट करताना काही अडचण आल्यास कंमेंट द्वारे नक्की विचारा.
     Technology संबंधित अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट द्या.

No comments:

Post a Comment

Adbox