दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघायचा | Maharashtra SSC Board Result Online 2021

 कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. निकाल जाहीर करण्याचे सूत्र शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडे होते. मंडळाने शाळांना मार्क्स संगणकात प्रविष्ट करण्यासाठी मुदत दिली होती ती आता संपलेली आहे, आणि आज म्हणजेच 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता SSC Result 2021 निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

    काही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येतात, त्यामुळे आम्ही दहावीचा निकाल कसा बघायचा हे या लेख मध्ये सांगणार आहोत. SSC Result 2021 कसा पहावा, कोणत्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात येणार आहे हे आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.

Maharashtra SSC Board Result Online 2021

दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघायचा | Maharashtra SSC Board Result Online 2021

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निकाल जाहीर करण्यासाठी काही अधिकृत वेबसाईट जाहीर केल्या आहेत. या वेबसाईट वरून आपण निकाल बरोबर दुपारी 1 वाजता पाहू शकता. निकालाच्या वेळी वेबसाईट बंद पडण्याची शक्यता असते, जर एखादी वेबसाईट उगडत नसेल तर दुसरी उगडून पहावी.


SSC Board Online Result 2021 Website-

1) www.mahresult.nic.in

2) www.sscresult.mkcl.org

3) www.maharashtraeduction.com


SSC Result 2021 Online कसा बघायचा?

1) सर्वात पहिले वर दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वर जायचे आहे.

2) त्यानंतर SSC Board Result नावाचा पर्याय शोधून त्यावर जायचे आहे.

3) पुढे तुमचा SSC Seat Number व्यवस्थित टाकायचा आहे.

4) पहिल्या रकान्यात तुमचा Seat Number असेल आणि दुसऱ्या रकान्यात आईचे नाव टाकायचे आहे.

5) हे सर्व योग्य रित्या भरल्यावर Show Result वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.


    चला आता तुम्हाला SSC Result 2021 Online, म्हणजेच दहावीचा निकाल कसा पाहायचा हे समजले असेल. तरीही तुम्हाला SSC Result 2021 Online पाहताना काहीही अडचण आली तर आम्हाला कंमेंट करून नक्की विचारा. आपल्या मित्राचा जर निकाल असेल ते त्यांनाही हा लेख शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>