Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

BBA ची माहिती - महा माहिती

   आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की BBA काय आहे? BBA चा long form काय आहे? आणि अजून बरीच माहिती . सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत पाहिजे की BBA ही एक पदवी आहे आणि या पदवीचा संबंध व्यवसायाशी आहे. आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला BBA संबंधित संपूर्ण माहिती (What is BBA in Marathi) देणार आहे.      सध्या विविध कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहेत. या वेळेत बरेच विध्यार्थी गोंधळात असतात की कशाला प्रवेश घेणे योग्य असेल किंवा कशाला नाही. BBA जर प्रवेश घेयचा असेल तर तुम्हाला BBA विषयी संपूर्ण माहिती असलीच पाहिजे. जर तुम्हाला BBA बद्दल संपूर्ण माहिती  पाहिजे असेल तर या माझ्या पोस्टला संपूर्ण वाचा. BBA म्हणजे काय?    BBA ही एक पदवी आहे. जसे BE, B.Com, BSc, BA ह्या पदव्या आहेत त्याच प्रमाणे BBA सुद्धा एक पदवीच आहे. ही पदवी 3 वर्ष्याची असते. BBA मध्ये व्यापार आणि व्यवस्थापन या विषयावर ज्ञान दिले जाते. या पदवीत संभाषण कौशल्य आणि उद्योजक कौशल्य विकसित केले जाते. BBA केल्यावर तुम्हाला सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता. पण असे मानले जाते की ज्या