BBA ची माहिती (BBA Information in Marathi) - महा माहिती

   आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की BBA काय आहे? BBA चा long form काय आहे? आणि अजून बरीच माहिती. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत पाहिजे की BBA ही एक पदवी आहे आणि या पदवीचा संबंध व्यवसायाशी आहे. आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला BBA संबंधित संपूर्ण माहिती (What is BBA in Marathi) देणार आहे. 

what is bba in marathi, bba in marathi, bba full form

    सध्या विविध कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहेत. या वेळेत बरेच विध्यार्थी गोंधळात असतात की कशाला प्रवेश घेणे योग्य असेल किंवा कशाला नाही. BBA जर प्रवेश घेयचा असेल तर तुम्हाला BBA विषयी संपूर्ण माहिती असलीच पाहिजे. जर तुम्हाला BBA बद्दल संपूर्ण माहिती (BBA information in Marathi) पाहिजे असेल तर या माझ्या पोस्टला संपूर्ण वाचा.


BBA म्हणजे काय? (What is BBA in Marathi?)

   BBA ही एक पदवी आहे. जसे BE, B.Com, BSc, BA ह्या पदव्या आहेत त्याच प्रमाणे BBA सुद्धा एक पदवीच आहे. ही पदवी 3 वर्ष्याची असते. BBA मध्ये व्यापार आणि व्यवस्थापन या विषयावर ज्ञान दिले जाते. या पदवीत संभाषण कौशल्य आणि उद्योजक कौशल्य विकसित केले जाते. BBA केल्यावर तुम्हाला सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता. पण असे मानले जाते की ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे तेच विद्यार्थी BBA ला प्रवेश घेतात. हे बरोबर सुद्धा आहे कारण या पदवीत व्यवसाय करण्याचेच शिक्षण दिले जाते. 

   BBA केल्यावर पुढे काय करता येते हे सुद्धा तुम्हाला माहिती करून घेयचे असेल. तसे म्हणजे ज्यादाकरून लोक BBA केल्यावर MBA करतात. MBA ही एक मास्टर पदवी आहे. ही पदवी 2 वर्ष्याची असते. BBA नंतर ही पदवी चांगली मानली जाते कारण यात सुद्धा व्यवसाय विषयक ज्ञान दिले जाते. BBA नंतर केल्या जाण्याऱ्या MBA सोडून अजून सुद्धा काही काही पदव्या आहेत ज्यातून तुम्ही व्यवसाय विषयक भरपूर ज्ञान मिळुउ शकता.


BBA चा फूल फॉर्म-

    BBA शब्दाचा फूल फॉर्म "Bachelor of Business Administration" असा होतो.


BBA कसे करावे?

    चला आपण BBA काय आहे? या बद्दल माहिती घेतली. आता आपण पाहू की BBA कसे करावे? यात आपण पाहणार आहोत की BBA साठी पात्रता काय पाहिजे? BBA कोठून केली पाहिजे? BBA साठी फी किती असते? 


1) BBA साठी पात्रता-

    BBA साठी कमीतकमी 45% मिळून बारावीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. कोणत्याही शाखेचे विद्यार्थी BBA ला घेऊ शकतात. सामान्यपणे BBA साठी कोणतीही परीक्षा आणि परंतु काही विद्यापीठ BBA साठी प्रवेशद्वार (Entrance) परीक्षा सुद्धा घेतात आणि या परीक्षेच्या गुणांनुसार प्रवेश दिला जातो. 

BBA लोकप्रिय प्रवेश परीक्षा -

  • NPAT 
  • UGAT 
  • IPMAT 
  • AUMAT 


2) BBA कोठून करावे-

   BBA करण्यासाठी मोठ्या शहरात काही कॉलेज आहेत. BBA हे कोणत्या गावात किंवा सामान्य शहरात शिकवले जात नाही. शहरात मोठमोठे विद्यापीठ असतात ते BBA च शिक्षण देतात. आता प्रश्न पडतो की BBA सरकारी कॉलेज मधून करावे की खाजगी? तसे पाहिले तर खाजगी कॉलेज मध्ये फी खूप जास्त असते. खाजगी कॉलेज मध्ये 60,000 रुपये पासून 4,00,000 पर्यंत फी असू शकते. सरकारी कॉलेज मध्ये फी अतिशय कमी असते. त्यामुळे ज्यादाकरून विद्यार्थी सरकारी कॉलेज घेण्याचा प्रयत्न करतात.


3) BBA नंतर पुढे काय करावे-

   BBA झाल्यानंतर पुढे खूप शिकता येते. MBA, PGDM, MMS सारखे पदव्या तुम्ही BBA नंतर घेऊ शकता. 

PGDM- Post Graduate Diploma in Management

    PGDM हा डिप्लोमा आहे आणि MBA डिग्री कोर्स आहे. हा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे.

MMS- Master of Management System

    MMS हा डिग्री कोर्स आहे. हा कोर्स सुद्धा 2 वर्षाचा आहे.


BBA साठी कोणत्या नोकऱ्या आहेत-

   BBA केल्यानंतर सरकारी किंवा खाजगी दोन्ही नोकऱ्या उपलब्ध आहेत. 


1) सरकारी- 

   BBA झाल्यानंतर सरकारी नोकऱ्या ज्यादाकरून बँकिंग क्षेत्रात मिळतात. पण खाजगी नोकऱ्यांच्या तुलनेत सरकारी नोकरीत कमी पगार मिळतो. सरकारी नोकऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की सरकारी नोकऱ्या सुरक्षित असतात.


2) खाजगी-

   BBA झाल्यानंतर तुम्ही जर खाजगी नोकरी करायला सुरुवात केली तर ते तुम्हाला सुरवातीला 10,000 ते 20,000 रुपये प्रति महिना असा पगार मिळतो. खाजगी कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवस्थापक, व्यवस्थापक, एच.आर मॅनेजर असे पद मिळू शकतात.


     चला आता तुम्हाला BBA बद्दल संपूर्ण माहिती (BBA Information in Marathi) मिळाली असेल. जर तुमच्या मनात जर अजून काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. तुमच्या जर कोणत्या मित्राला जर याची गरज असेल तर त्यालासुद्धा पाठवणे विसरू नका. तुम्हाला जर पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडियावर जरूर शेअर करा. धन्यवाद!

9 टिप्पण्या

  1. मि मराठी medium चा विद्यार्थि आहे मला हे जमेल का?

    उत्तर द्याहटवा
  2. MBA नंतर कंपनीत जास्तीत जास्त किती पगार मिळतो

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने
–>