What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.
आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.
सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.
संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार्डवेअर बद्दल माहिती पाहिजे असेल तर येथे क्लिक करा.
Related - संगणकाच्या भागांची नावे
सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?)
सॉफ्टवेअर म्हणजे सूचनांचा किंवा प्रोग्रॅम्स चा एक समूह आहे जो कोणत्याही कार्याला पूर्ण करण्यासाठी सूचना देत असतो. सॉफ्टवेअर हा डोळ्याने दिसू शकत नाही आणि तुम्ही त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. सॉफ्टवेअर शिवाय संगणक हा फक्त एक निर्जीव खोके आहे ज्याचा काहीही उपयोग नाही. सॉफ्टवेअर हे फक्त एक आभासी वस्तू आहे त्याला फक्त समजून घेता येते.
सोप्या भाषेत पहायचे तर सॉफ्टवेअर म्हणजे लिखित स्वरूपात संगणकाला दिलेल्या सूचना. या सूचना देण्यासाठी काही वेग-वेगळ्या भाषा वापरल्या जातात. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी Python, Java, C+ आणि अजून बऱ्याच भाषा आहेत. संगणकामध्ये सॉफ्टवेअर टाकल्याशिवाय त्यात जीवच येत नाही असे म्हणले तरी चालेल.
सॉफ्टवेअर चे प्रकार- (Types of Software in Marathi)
सॉफ्टवेअर कोणत्या कामासाठी वापरतात त्यावरून त्याचे प्रकार पाडले आहेत.
1) System Software
2) Application Software
1) System Software-
System सॉफ्टवेअरचा उपयोग हार्डवेअरला नियंत्रित करण्यासाठी केला जातो. याचेसुद्धा काही प्रकार आहेत.
1) Operating System-
Operating System म्हणजे असा संगणक प्रोग्रॅम जो अन्य संगणक प्रोग्रॅम्स ला नियंत्रित करतो. सोपे म्हणजे संगणकाचा महत्वाचा भाग ज्यालाच windows सॉफ्टवेअर म्हणतात आणि स्मार्टफोन च पाहिलं तर android सॉफ्टवेअर.
2) Utility Programs-
Utility Program ला Service Program या नावाने सुद्धा ओळखले जाते. संगणकामधल्या संसाधनांचे नियंत्रण आणि सुरक्षेचे कार्य हे Utility प्रोग्रॅम्स करतात.
Antivirus सारखे प्रोग्रॅम्स हे utility प्रोग्रॅम्स च्या प्रकारात येतात.
3) Device Drivers-
Device Driver प्रोग्रॅम इनपुट आउटपुट उपकरणांमध्ये वापरला जातो ज्याच्या मदतीने उपकरण आणि संगणक हे एकमेकांशी जोडले जातात. Motherboard Drivers, Graphic Drivers, Audio Drivers हे काही Device Drivers ची उदाहरणे आहेत.
2) Application Software-
Application Software चा संबंध सरळ वापरकर्त्याशी येतो. यांना "apps" असे सुद्धा म्हणले जाते. Application Software वापरून वापरकर्त्याला कोणतेही कार्य करण्याचा मोकळेपणा मिळतो. Application Software चे काही प्रकार आहेत.
1) Basic Application-
Basic Application सॉफ्टवेअर ला सामान्य हेतू सॉफ्टवेअर (General Purpose Software) असेही म्हणले जाते. हे सॉफ्टवेअर सामान्य कामासाठी वापरले जातात.
2) Specialized Application-
Specialized Application ला विशेष हेतू सॉफ्टवेअर (Special Purpose Software) असेही म्हणले जाते. या सॉफ्टवेअरला कोणत्या विशिष्ट हेतूसाठी बनवले जाते.
सॉफ्टवेअर कसे तयार करतात?
सॉफ्टवेअर बनवणे हे काय सोपे काम नसते. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काही विशिष्ट प्रोग्रामिंग भाषांचा विकास केला गेलेला आहे. या भाषा ज्याला येतात त्यालाच सॉफ्टवेअर बनवता येते. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी खूप भाषा आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी या भाषेचे ज्ञान असावे लागते. मी खाली काही भाषांची नावे दिलेली आहेत.
1) JavaScript
2) Python
3) Java
4) PHP
5) Swift
या भाषा सोडून अजून बऱ्याच भाषा आहेत, परंतु या लोकप्रिय भाषा आहेत. या सर्व भाषेत कुशल होणे सोपे नाही आणि याची गरज ही नाही. तुम्हाला सुरवातीला java, C, C++ अशा भाषा शिकाव्या लागतात. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी या भाषांचा वापर केला जातो.
मला आशा आहे की तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर चे प्रकार, सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते? या विषयावर पूर्ण माहिती मिळाली असेल. जर माझ्याकडून जर काही राहिले असेल तर कंमेंट करून सांगा. Information of Computer Software in Marathi पोस्टला सोशल मीडियावर पाठवणे विसरू नका. तंत्रज्ञानाशी संबंधित माहितीसाठी माझ्या या ब्लॉगला वारंवार भेट द्या. धन्यवाद!
मराठी ज्ञान वृद्धिंगत होण्याकरिता तसेच सुविचार, विचारवंत, किल्यांचा इतिहास, निबंध, कविता, बोधकथा यांची माहिती मिळवण्यासाठी आई मराठी या ब्लॉगला भेट द्या.
सोफटवेअरचे पारट किती व कोणते
ReplyDelete