आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.
तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात.
अनुक्रमणिका
वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?)
वेबसाईट म्हणजे वेब पेजेस चा एक संच असतो. प्रत्येक वेब पेज मध्ये काही न काही माहिती साठवलेली असते. जसे या वेब पेज वर वेबसाईट बद्दल माहिती साठवलेली आहे आणि या वेबसाईट चे नाव महा माहिती (https://www.mahamahiti.in/) असे आहे. यासारखे बरेच वेब पेज या वेबसाईटवर आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वेबसाईट म्हणजे एक अशी जागा ज्यात वेब पेजेस ठेवलेले असतात.
प्रत्येक वेबसाईटला एक वेगळे डोमेन नेम असते. कोणत्याही दोन वेबसाईट चे डोमेन नेम सारखे नसते. हे डोमेन नेम चा वापर करून वेबसाईट च्या प्रत्येक वेब पेजसाठी एक विशिष्ट URL असते. URL म्हणजे लिंक ज्यावर क्लिक केल्यावर त्या ठराविक वेबसाईटवर व्यक्तीला नेले जाते.
वेबसाईट वर जायला एक एप किंवा सॉफ्टवेअर ची गरज असते ज्याला वेब ब्राउजर असे म्हणले जाते. जसे की Google Chrome, Jio Browser, Operamini हे काही वेब ब्राउजर ची उदाहरणे आहेत. यावर जाऊन आपल्याला काहीतरी सर्च करावे लागते. मग पुढे सर्च इंजिन तुम्हाला वेबसाईटच्या पेजेस ची एक लिस्ट दाखवते आणि तुम्ही त्यावर क्लिक करता आणि वेबसाईटवर जाता.
आता तुम्हाला वेबसाईट म्हणजे काय हे पूर्णपणे समजले असेल. वेबसाईट चे काही प्रकार सुद्धा असतात. चला आता वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत हे पाहुयात.
वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)
वेबसाईट चे मुख्यतः दोन प्रकार आहेत-
१) Static Website
२) Dynamic Website
तर चला आता दोन्ही प्रकार समजून घेऊयात.
१) Static Websites-
Static वेबसाईटला स्थिर वेबसाईट असे म्हणतात. या प्रकारामध्ये वेबसाईटची बनावट ही स्थिर स्वरूपात असते. Static वेबसाईट मधील वेब पेजेस चा HTML कोड हा वेब सर्व्हरमध्ये साठवलेला असतो. वेबसाईटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेबसाईट ही सारखीच दिसते.
Static वेबसाईटला वेब प्रोग्रॅमिंग किंवा डेटा बेस डिजाईन ची गरज नसते. Static वेबसाईट हा वेबसाईट चा सर्वात मूळचा भाग असतो आणि हा बनवायला सोपा असतो.
छोट्या वेबसाईट साठी static वेबसाईट वापरणे उत्तम असते आणि जर मोठी वेबसाईट बनवायची असेल तर dynamic वेबसाईट बनवावी लागते. तर आता आपण dynamic वेबसाईट काय असते हे पाहुयात.
२) Dynamic Websites-
Dynamic वेबसाईट साठी वेब प्रोग्रामिंग आणि डेटा बेस डिजाईन ची गरज असते. या प्रकारच्या वेबसाईटमध्ये माहिती साठवलेली असते आणि यात बदल होत असतो.
Dynamic वेबसाईट मधील माहिती साठवण्यासाठी Content Management System चा वापर केला जातो. जसे ब्लॉगर, वर्डप्रेस, विक्स असे काही Content Management System आहेत.
जेव्हा वेबसाईट कोणी व्यक्ती भेट देतो, तेव्हा वेबसाईट त्याच्यासाठी वेगळी माहिती दर्शवते. जसे फेसबुक प्रत्येक व्यक्ती ला वेगळ्या पोस्ट दाखवते.
Dynamic वेबसाईट वापरण्याचा फायदा असा की ही हाताळायला सोपी असते आणि तोटा असा की वेबसाईट बनवायला जास्त खर्च येतो.
जगातली पहिली वेबसाईट कोणती आहे?
जगातली पहिली वेबसाईट टीम बर्नर्स-ली यांनी CERN मध्ये बनवली होती आणि ६ ऑगस्ट १९९१ रोजी लागू केली गेली होती. https://www.info.cern.ch ही जगातली सर्वात पहिली वेबसाईट आहे.
इंटरनेट वर किती वेबसाईट आहेत?इंटरनेट वर २ अब्ज वेबसाईट आहेत आणि ही संख्या दर मिनिटाला वाढत आहे.
वेबसाईट कोण बनवू शकतो?कोणीही व्यक्ती, सरकार, किंवा संस्था वेबसाईट बनवू शकतात.
वेबसाईट कशी बनवतात?वेबसाईट बनवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. वेबसाईट बनवण्यासाठी काही संगणकीय भाषा शिकाव्या लागतात किंवा इंटरनेट वर काही प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत. त्यावर संगणकीय भाषाशिवाय वेबसाईट बनवता येते.
निष्कर्ष-
आता तुम्हाला वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi?) हे समजले असेल. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
हे पण वाचा-
खुप छान माहिती ...
ReplyDeleteसुंदर लेख आहे.
ReplyDeleteनमस्कार मित्रांनो,मी प्रकाश. ऑनलाईन पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंग कसे करावे याबद्दल माहिती मिळेल. माझ्या वेबसाईटची लिंक http://marathikaushalya.in आपल्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल.
useful information
ReplyDeleteMarathimdhe website information share kelis tyabdl Thank you
ReplyDeletenice article brother खारीक खाण्याचे फायदे
ReplyDeleteMulethi In Marathi
This comment has been removed by a blog administrator.
Delete