Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.
     सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात.

हे वाचा - 

संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)

    हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याला डोळ्याने दिसतात. ज्यांना आपण हाताने स्पर्श करू शकतो. हार्डवेअर म्हणजे संगणकाशी संबंधित भौतिक वस्तू ज्यात इनपुट आउटपुट उपकरणांचा समावेश होतो. संगणकामध्ये जे माहिती साठवणारी उपकरणे आहेत ते हार्डवेअर आहेत. हार्डवेअर नसल्यावर संगणकाचा काहीही उपयोग नाही. हार्डवेअरच नसल्यावर सॉफ्टवेअर टाकताच येत नाही.
   सॉफ्टवेअरला संगणकाचा आत्मा म्हणले जाते आणि हार्डवेअरला शरीर म्हणले जाते. समजा की तुम्हाला संगणकावर गाणे ऐकायचे आहे तर तुम्हाला माउस ची मदत घ्यावी लागते, तुम्ही स्क्रीन वर पाहता की कोणते गाणे ऐकायचे आहे त्यानुसार तुम्ही गाणे लावता. गाण्याचा आवाज ज्या साऊंड मधून येतो ते सुद्धा एक हार्डवेअरच आहे. हार्डवेअर म्हणजे काय हे तर तुम्हाला कळले असेल आता पाहुयात हार्डवेअरचे प्रकार कोणते आहेत.

संगणक हार्डवेअरचे प्रकार- (Types of Hardware in Marathi)

     संगणक हा दोन सिस्टिमच्या स्वरूपात असतो एक म्हणजे डेस्कटॉप आणि दुसरे लॅपटॉप. डेस्कटॉप मध्ये सगळे घटक वेगळे असतात. लॅपटॉप मध्ये सगळे घटक एकत्रितपणे जोडले असतात त्यांना कमी जागेत बसवलेले असते. चला हार्डवेअर चे काही प्रकार पाहुयात.

1) RAM-

     RAM चा फूल फॉर्म आहे "Random Access Memory". रॅम संगणक हार्डवेअर चा एक प्रकार आहे त्याचा उपयोग माहिती साठवण्यासाठी आणि माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. रॅम मध्ये माहिती कायमस्वरूपी साठवून ठेवता येत नाही. रॅम थोड्या काळासाठी माहिती साठवू शकतो. तुम्ही फोन मध्ये recent हा पर्याय पहिला असेल त्यात आपण उगढलेले अँप्स काही काळासाठी तसेच चालू ठेवता येतात ते रॅम च्या मदतीने होते.

2) Hard Disc-

    हार्ड डिस्क हार्डवेअर चा दुसरा प्रकार आहे ज्याचा वापत माहिती साठवण्यासाठी केला जातो. पण हा रॅम पेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. हार्ड डिस्क मध्ये माहिती 
कायमस्वरूपी साठवून ठेवता येते. हार्ड डिस्क मध्ये इलेक्टरो मॅग्नेटिक पृष्ठभागाचा वापर केला जातो जो हार्ड डिस्क ला माहिती साठवण्यायोग्य बनवतो. हार्ड डिस्क मध्ये माहिती साठवण्याची क्षमता रॅम च्या तुलनेत जास्त असते.

3) Monitor-

    संगणक वापरताना ज्याच्या समोर तुम्ही बसतात मॉनिटर असते. मॉनिटर हार्डवेअर चा वापर आउटपुट दर्शवण्यासाठी होतो. मॉनिटर च्या स्क्रीन वर विडिओ, आणि ग्राफिक्स पाहता येते. विडिओ दर्शवण्यासाठी विडिओ कार्ड ची गरज असते. मॉनिटर टेलिव्हिजन सेट सारखाच असतो फक्त फरक एवढाच असतो की मॉनिटर मध्ये रेसोल्युशन आणि ग्राफिक्स जास्त असतो.
 

4) CPU- 

     CPU चा फुल फॉर्म होतो "Central Processing Unit". CPU हा संगणक प्रणालीचा मुख्य हार्डवेअर भाग आहे ज्याचा उपयोग संगणकाच्या इतर भाग म्हणजेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा वापर करून बहुतेक आदेशांचा स्पष्टीकरण आणि अंमलबजावणीसाठी केला जातो. CPU ला संगणकाचा मेंदू सुद्धा म्हणले जाते. CPU ला मॉनिटर, कीबोर्ड, प्रिंटर असे बाकीचे हार्डवेअर जोडलेले असतात. 

5) Mouse-

     माउस हाताने वापरायचे हार्डवेअर आहे त्याचा उपयोग स्क्रीन वर काहीतरी दर्शवण्यासाठी केला जातो. माउस वायरचा असू शकतो किंवा वायरलेस असू शकतो. आपल्याला स्क्रीन वर जो एक छोटासा बाण दिसतो तो माउस च्या साहाय्याने नियंत्रित केला जातो. 
 


6) Keyboard- 

     कीबोर्ड हा हार्डवेअर हार्डवेअर चा एक प्रकार आहे याचा उपयोग टायपिंग करण्यासाठी केला जातो. माऊस प्रमाणे कीबोर्ड वायरचा किंवा वायरलेस सुद्धा असू शकतो. कीबोर्ड वर संख्या, अक्षरे, आणि चिन्हे लिहलेले असतात. त्या चिन्हावरचे बटण दाबल्यावर ते स्क्रीन वर टाइप होते. 

     मला आशा आहे की तुम्हाला हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार या विषयावर पूर्ण माहिती मिळाली असेल. जर माझ्याकडून जर काही राहिले असेल तर कंमेंट करून सांगा. पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत पाठवणे विसरू नका. तंत्रज्ञानाशी संबंधित माहितीसाठी माझ्या या ब्लॉगला वारंवार भेट देत रहा.
धन्यवाद!
 

Comments

 1. chhan blog banwala sir
  aapan aamachya blog la pan visit karu shakta
  aaimarathi.com

  ReplyDelete
 2. Khup chan Mahiti Santitli aahe प्रेम तुझं खरं असेल तर
  जीव तुझ्यावर ओवाळेल ती
  स्वत:च्याचं भावनांचं मन
  शेवटी ती मारेल तरी कीती..

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे