JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Friday, 20 November 2020

ब्लॉगरवर ब्लॉग कसा तयार करायचा - महा माहिती

     आजच्या काळात खूप लोक इंटरनेट च्या क्षेत्रात काम करून खूप पैसे कमवत आहेत. ब्लॉगिंग सुद्धा यातलेच एक साधन आहे. खूप मराठी लोकांना माहिती नाही कि ब्लॉग कसा बनवायचा यामुळेच मी हि पोस्ट ,मराठीत आणली आहे, मी यात सांगणार आहे की ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला एकही रुपयांचा खर्च करण्याची गरज नाही. गुगल ने असे साधन उपलब्ध करून दिले आहे ते वापरून तुम्ही फुकट मध्ये ब्लॉग बनवू शकता. 

    ब्लॉगर हे एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ब्लॉगर वर ब्लॉग चालवता येतो. ब्लॉगर चा निर्माण 1999 साली करण्यात आला होता पुढे 2003 मध्ये गुगल ने हे ताब्यात घेतले. ब्लॉगिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही ब्लॉग बनवून पहिलाच पाहिजे आणि तुम्हाला काही खर्च सुद्धा नाही फुकटच आहे ना. ब्लॉग काय आहे? याच्या माहितीसाठी तुम्ही या ब्लॉग वरील पोस्ट वाचू शकता मी त्याची लिंक खाली देत आहे. चला वेळ न लावता पाहुत की ब्लॉग कसा बनवायचा. 
ब्लॉगरमध्ये कस्टम थीम टेम्प्लेट कसे जोडावे - महा माहिती

ब्लॉगरवर ब्लॉग कसा बनवायचा? 

     ब्लॉग तयार करण्यासाठी तुमचे स्वतःचे ई-मेल अकाउंट असणे गरजेचे आहे. जर ई-मेल नसेल तर तुम्ही ई-मेल बनवा आणि पुढे मी सांगितलेल्या नुसार ब्लॉग बनवा.
1) सगळ्यात आधी तुमच्या फोन मधले ब्राउजर उगढून गुगलच्या blogger.com या वेबसाईटवर जा. 

2) तुमच्यासमोर गुगल चे ब्लॉगर हे साधन उगढेल. तेथे 'CREATE YOUR BLOG' या बटण वर टच करा. 

3) पुढे तुम्हाला ई-मेल आणि पासवर्ड विचारला जाईल. तेथे योग्य माहिती टाकून 'Next' बटण वरक्लिक करा.
4) नंतर 'New Blog' वर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला ब्लॉग चे टायटल विचारले जाईल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते टायटल द्या आणि 'Next' बटण वर क्लिक करा.

5) आता तुम्हाला ब्लॉग चे URL टाकायचे आहे. ब्लॉगसाठी URL टाकून 'save' बटण वर क्लिक करा.

6) अभिनंदन! तुमचा ब्लॉग तयार झाला आहे. आता तुम्ही पोस्ट लिहू शकता. 
  
     चला ब्लॉग कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगितले. आता पुढे तुम्हाला खूप माहितीची गरज आहे. मी ब्लॉग शी संबंधित तुम्हाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु तुम्हाला सतत माझ्या ब्लॉगला भेट द्यावी लागेल. अजून कोणत्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून सांगा. पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment

Adbox