JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Wednesday, 25 November 2020

इन्स्टाग्राम चा पासवर्ड रीसेट कसा करायचा - महा माहिती

   इन्स्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया एप आहे. इन्स्टाग्राम चा वापर जगभरात 1 अब्ज लोक करतात. इन्स्टाग्राम चा वापर अनेकजण अनेक प्रकारे करतात. काही लोकांसाठी इन्स्टाग्राम एक फोटो पाठवण्याचा मंच असतो तर काहींसाठी आपल्या मौल्यवान आठवणी साठवण्याचे ठिकाण. तर काही आपला व्यवसाची जाहिरात करण्यासाठी वापरतात. अशा महत्वाच्या इन्स्टाग्राम ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खूप काही करता.
How to Reset the Instagram Password in Marathi?

    काही लोक वेळोवेळी पासवर्ड बदलत असतात. आणि जर अशा महत्वाच्या गोष्टीचा जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर.. काही जणांना पासवर्ड कसा मिळवायचा हे माहीत असते. ज्यांना माहीत नाही ते तर खूप घाबरून जातात त्यांना वाटते की आता आपल्याला दुसरे अकाउंट बनवावे लागेल. मी त्यांच्यासाठी खास ही पोस्ट घेऊन आलो आहे. या पोस्ट मध्ये इन्स्टाग्राम पासवर्ड रीसेट कसा करायचा याची पूर्ण माहिती आहे. तर पोस्ट काळजीपूर्वक वाचा.

इन्स्टाग्राम पासवर्ड रीसेट कसा करायचा-

1) सगळ्यात आधी तुमच्या इन्स्टाग्राम वर जा. एप किंवा ब्राउजर काहीही असले तरी काही अडचण नाही.
2) इन्स्टाग्राम वर गेल्यावर "Get Help Signing In" वर टच करा. जर तुम्ही ब्राउजर वर असाल तर "Forgot Password" वर टच करा.


3) पुढे तुम्हाला तुमचे इन्स्टाग्राम चे Username, ई-मेल, किंवा फोन नंबर विचारला जाईल. तो ध्यानपूर्वक टाका. आणि "Send Login Link" वर टच करा.
आणि जर एप वरून करत असाल तर तीन पर्याय येतील. त्यातील एक निवडा.


4) थोड्याच क्षणात तुम्हाला तुमच्या ई-मेल किंवा फोन नंबर वर संदेश येईल. त्या संदेश मध्ये एक लिंक येईल ती उगडा. तुम्हाला तेथे नवीन पासवर्ड विचारला जाईल तो टाका आणि जतन करा.
5) आता तुमचा पासवर्ड बदलला आहे तुम्ही नवीन पासवर्ड वापरून इन्स्टाग्राम उगढू करू शकता.


    मला वाटते की आता तुम्हीं इन्स्टाग्राम चा पासवर्ड रीसेट करू शकता. तुम्हाला जर अजून काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे मला कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांना पाठवणे विसरू नका. धन्यवाद!

     

4 comments:

Adbox