JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Friday, 20 November 2020

जागतिक ओझोन दिन संपूर्ण माहिती मराठी मध्ये

     आज 16 सप्टेंबर 2020, आज संपूर्ण जगात जागतिक ओझोन दिवस साजरा केला जात आहे. ओझोन थराबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने आजचा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओझोन चा थर आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलट किरणांपासून वाचवण्याचे काम करतो.
    सूर्यापासून येणारी ह्या किरणांमुळे त्वचारोग, कॅन्सर आणि अजून बरेच रोग होऊ शकतात म्हणजे ओझोन शिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. आज आपण पाहू की ओझोनचा थर काय आहे? ओझोन दिवस का साजरा केला जातो? आणि आजच्या ओझोन दिवसाची थीम काय आहे?

हे वाचा-

ओझोन थर म्हणजे काय?

     आपल्या पृथ्वीचे वातावरण अनेक थरांचे मिळून तयार झालेले आहे. पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात बाहेरचा थर म्हणजे ओझोन चा थर होय. ओझोन थर हा ओझोन नावाच्या वायू चा एक थर आहे. हा वायू निळ्या रंगाचा असतो. ओझोन (O3) थर  जमिनीपासून 20-30 किलोमीटर अंतरावर असतो. ओझोन थर हा ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र येऊन तयार झाला आहे. ओझोन चा शोध 1913 मध्ये फ्रांस मधले भौतिकशास्त्रज्ञ फैबरी चार्ल्स आणि हेनरी बुसोन यांनी लावला होता.

जागतिक ओझोन दिवस - इतिहास

    ओझोन थराचे महत्व जगाला समजल्यावर ओझोन ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युनायटेड नेशन येथे 23 जानेवारी 1995 रोजी झालेल्या आम सभेत 16 सप्टेंबर या दिवसाला जागतिक ओझोन दिवस म्हणून घोषित करण्यात आले. तेंव्हा एक लक्ष ठेवले होते की 2010 पर्यंत ओझोन थराला पूरक असे वातावरण बनवण्यात यावे परंतु जग अजूनही या लक्षपासून खूप दूर आहे. 

जागतिक ओझोन दिवस - थीम

    ओझोन दिवसासाठी प्रत्येक वर्षी एक वेगळी थीम ठेवलेली असते. या वर्षी सुद्धा एक थीम आहे. जागतिक ओझोन दिवस 2020 ची थीम आहे "आयुष्यासाठी ओझोन: ओझोन थर संरक्षणाची 35 वर्षे ". 

ओझोन थर कमी झाला तर काय होईल?


1) ओझोन थर कमी झाल्यावर मानवावर त्याचा परिणाम दिसून येईल. मानवाला त्वचा रोग, कर्करोग, लवकर वृद्धत्व असे आजार होतील.
2) ओझोन थर कमी झाल्याने वनस्पती वर सुद्धा परिणाम होईल. वनस्पतींच्या पानांचा आणि फळांचा आकार कमी होईल. त्याच प्रमाणे पिकाचे उत्पादन सुद्धा कमी निघेल.
3) लहान लहान कीटक कमी होतील. काही कीटकांना जास्त उष्णता सहन होत नाही ते मरून जातील.
4) त्याचप्रमाणे पाण्यातल्या जीवांवर सुद्धा परिणाम होईल. पाण्यातील सूक्ष्म घटक नस्ट होतील. 
5) आणि शेवटी संपूर्ण अन्नसाखळी नस्ट होऊन जाईल. आणि पृथ्वीवरले सगळे जीव काही काळाने नस्ट होतील.

ओझोन थराचे संरक्षण कसे करावे?

     आजच्या ओझोन दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला ओझोन थराची सुरक्षा कशी करता येईल यासाठी पाच पद्धती सांगत आहे प्रत्येकाणे या पद्धती अमलात आणल्याच पाहिजे.
1) ओझोन थरासाठी घातक अश्या वायूंचा वापर करू नका.
2) गाड्यांचा वापर कमी करा.
3) पर्यावरणाला हानिकारक अशी साफसफाईची उत्पादने वापरू नका.
4) स्थानिक उत्पादने खरेदी करा.
5) फ्रिज सारख्या वस्तू चा वापर टाळा.
  
     चला आता तुम्हाला जागतिक ओझोन दिवसाबद्दल खूप माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर अजून काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा आणि लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

1 comment:

  1. सर्वोत्कृष्ट ही पोस्ट वाटली.
    https://marathikida.org/

    ReplyDelete

Adbox