JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Tuesday, 22 June 2021

Affiliate मार्केटिंग म्हणजे काय - What is Affiliate Marketing in Marathi

    आजचा काळ हा कॉम्पुटर, इंटरनेट आणि ऑनलाईन शॉपिंग चा आहे. आजकाल याबद्दल खूप लोकांची आवड वाढली आहे आणि याच ऑनलाईन जमान्यात एक शब्द आहे Affiliate Marketing. आज आपण Affiliate मार्केटींग बद्दल माहिती करून घेणार आहोत. या पोस्ट मध्ये आपण Affiliate Marketing काय आहे? (What is affiliate marketing in marathi?) Affiliate मार्केटिंग कसे कार्य करते आणि अजून महत्वाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी पोस्ट ध्यान देऊन वाचा. 


Affiliate Marketing म्हणजे काय? (What is affiliate marketing in marathi?)

   Affiliate मार्केटिंग ही एक अशी पद्धत आहे, जेंव्हा कोणी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉग, सोशल मीडिया वर कोणत्याही कंपनी किंवा संस्थेच्या वस्तूंचा प्रचार करतो आणि जर कोणी त्या व्यक्ती द्वारे कंपनी ची वस्तू खरेदी करतो तर त्या व्यक्तीला काही टक्के कमिशन मिळते. मिळणारे कमिशन हे वस्तूच्या किमतीवर निर्धारित असते. त्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, वेब होस्टिंग, व इतर काहीही असू शकतात. 
   Affiliate मार्केटिंग देणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या इंटरनेट वर आहेत. तुम्हाला फक्त गुगल मध्ये कंपनी चे नाव आणि पुढे affiliate program सर्च करायचे आहे. यात अजून एक सुविधा असते की तुम्ही जर कंपनीसाठी affiliate मार्केटर आणले तर कंपनी तुम्हाला त्यातून सुद्धा इतर पैसे देते. हे पैसे तो व्यक्ती महिन्याला किती कमावतो त्यावर निर्धारित असतात. पण काही कंपन्या ही सुविधा देत नाहीत आणि काही देतात. 

Affiliate Marketing कसे कार्य करते? (How does affiliate marketing work?)

     आपण affiliate marketing काय आहे हे पाहिले. आता आपण पाहू की हे कार्य कसे करते. 
1) सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणत्यातरी affiliate प्रोग्राम ला जॉईन व्हावं लागते. 
2) जॉईन झाल्यावर तुम्हाला जी वस्तूची जाहिरात करायची आहे ती वस्तू निवडावी लागते आणि त्या वस्तू ची लिंक/वेबसाईट कॉपी करून घ्यावी लागते.

3) कॉपी केलेली लिंक तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर किंवा सोशल मीडिया वर टाकायची आहे किंवा तुम्हाला बॅनर दिला जातो तो तुमच्या वेबसाईटवर दाखवावा लागतो.
4) आता महत्त्वाची बाब- तुम्ही टाकलेल्या लिंक किंवा बॅनर वर जर कोणी टच केलं आणि ती वस्तू त्या कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने विकत घेतली. तर कंपनी तुम्हाला कमिशन देते.
5) कंपनी तुम्हाला जे कमिशन देते ते त्या वस्तूच्या किमतीवर निर्धारित असते. जर वस्तू जास्त किमतीची असेल तर कमिशन जास्त मिळते आणि कमी असेल तर कमी मिळते.

Affiliate Marketing संबंधित काही व्याख्या-

      या मार्केटिंग मध्ये काही नवीन शब्दांचा वापर होतो. ते आपण जाणून घेऊयात-

1) Affiliate-

     Affiliate त्याला म्हटले जाते तो एखाद्या affiliate प्रोग्रॅम ला जॉईन होऊन कंपनीच्या वस्तूंचा प्रचार (Promote) स्वतःच्या वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडियावर करतो. 

2) Affiliate Marketplace-

     इंटरनेट वर बऱ्याच अश्या कंपन्या आहेत की त्या affiliate प्रोग्रॅमची सेवा प्रदान करतात. अश्या सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना affiliate marketplace असे म्हणतात.

3) Affiliate लिंक-

     Affiliate लिंक हा कंपनी कडून दिला जातो. तो तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडियावर टाकावा लागतो. जर कोणी त्यावर क्लीक केले तर तो वस्तूच्या वेबसाईटवर जाऊन पोहोचतो. याचा उपयोग तुमच्याकडून किती वस्तू विकल्या गेल्या हे पाहण्यासाठी केला जातो.

4) Affiliate ID-

     Affiliate ID ही तुम्हाला जॉईन झाल्यावर दिली जाते. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करण्यासाठी केला जातो.


5) Commission-(कमिशन)

     एका वस्तूची तुमच्याद्वारे विक्री झाली तर कंपनीकडून तुम्हाला दिल्या जाणाऱ्या रकमेला commission म्हणतात. Commission हे वस्तूच्या किमतीवर निर्धारित असते.

काही लोकप्रिय Affiliate कंपन्या-

    मी येथे काही लोकप्रिय affiliate कंपन्याची नावे देत आहे. तुम्हाला जर कोणत्या कंपनीला जॉईन व्हायचे असेल तर गूगलमध्ये जाऊन कंपनी चे नाव आणि पुढे affiliate program असे सर्च करू शकता.
1) Amazon Affiliate
2) Flipkart Affiliate
3) vCommission
4) Snapdeal Affiliate
5) Clickbank
6) Commission Junction
7)  eBay

    पोस्ट ध्यानपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद! या पोस्ट मध्ये तुम्हाला कळले असेल की affiliate मार्केटिंग काय आहे? आणि ते काम कसे करते? तरी पण अजून तुम्हाला जर कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कंमेंट द्वारे मला कळवा. तुम्हाला जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पाठवणे विसरू नका.

No comments:

Post a Comment

Adbox