Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

ब्लॉगर काय आहे आणि हे वापरण्याचे प्रमुख फायदे - महा माहिती

    आपले ज्ञान, आपल्या जवळची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात चांगला आणि परवडणारा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग द्वारे तुम्ही तुमची माहिती इतर लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचून पैसे कमवू शकता. ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला ब्लॉग बनवावा लागतो, त्यावर पोस्ट लिहाव्या लागतात म्हणजे ब्लॉग नियोजन करावे लागते. 

    काहींचा असा गैरसमज असतो की ब्लॉग/वेबसाईट बनवण्यासाठी कोडींग शिकावी लागते. तुम्हाला जर वाटत असेल की ब्लॉग बनवण्यासाठी कोडींग शिकावे लागते तर असे काहीही नाही. कोडींग येत नसेल तरीही तुम्ही एक ब्लॉग बनवून पैसे कमवू शकता.

   ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला लागते एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणजे ब्लॉगिंग व्यासपीठ ज्यावर सोप्या पद्धतीने ब्लॉगिंग केली जाऊ शकते. तर आज आपण अशाच एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे "ब्लॉगर" (Blogger.com). आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार की ब्लॉगर नेमकं आहे काय आणि हे वापरल्याचे नवीन ब्लॉगर्स ला काय-काय फायदे होतात. तर संपूर्ण माहितीसाठी पोस्टला पूर्ण वाचा.


ब्लॉगर काय आहे? (What is Blogger.com in Marathi?)

  ब्लॉगर हे एक विनामूल्य ब्लॉगिंग व्यासपीठ आहे. याचा निर्माण ब्लॉग लिहिणे आणि ब्लॉगचे नियोजन करण्यासाठी केला गेलेला आहे. ब्लॉगर चा निर्माण Pyra Labs कंपनीने 23 ऑगस्ट 1999मध्ये केला होता, पुढे 2003 मध्ये गुगल ने ब्लॉगर विकत घेतले.


  ब्लॉगर ला होस्टिंग सेवा गुगल ची आहे आणि यात उपभोक्ताला फुकट सब डोमेन .blogspot.com दिले जाते आणि कस्टम डोमेन नेम जोडायची सुविधा सुद्धा यात देण्यात आलेली आहे. ब्लॉगर वर एक व्यक्ती 100 ब्लॉग्स एका अकाउंट द्वारे बनवू शकतो. 

   ब्लॉगिंग व्यासपीठ म्हणून ब्लॉगर सर्व सुविधा युक्त आहे आणि पूर्णपणे फुकट सुद्धा आहे. त्यामुळेच इंटरनेट वरील 35% पेक्षा जास्त ब्लॉग ब्लॉगर वर आहेत. तुम्ही जर ब्लॉगिंगमध्ये नवीन आहात, जास्त माहिती नसेल तर काहीही खर्च न करता ब्लॉगर वर सुरुवात करायला काहीही हरकत नाही. आता आपण पुढे ब्लॉगर वापरण्याचे काय फायदे होतात हे पाहुयात.


ब्लॉगर (Blogger.com) वापरण्याचे फायदे-

    ब्लॉगर लोकप्रिय असण्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण खाली पाहुयात.


1) संपूर्णपणे फुकट-

   ब्लॉगर हे सर्वांसाठी फुकट आहे. यावर तुम्हाला एक रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही. ब्लॉगरसारखे इतर ब्लॉगिंग व्यासपीठ हे पैसे घेतात. गुगल ने ब्लॉगर सर्वांसाठी फुकट उपलब्ध करून दिले आहे. 

   वर्डप्रेस हे ब्लॉगिंग व्यासपीठ वापरायचे असेल तर डोमेन नेम आणि होस्टिंग चे पैसे द्यावे लागतात आणि ब्लॉगर मध्ये होस्टिंग ची सुविधा गुगल ने दिली आहे म्हणजे ब्लॉग हॅकर्सपासून संपूर्णपणे सुरक्षित असणार आहे. यात तुम्हाला SSL- सर्टिफिकेट, डोमेन मॅपिंग या सर्व सुविधा सुद्धा फुकट आहेत. 

   कसलेही सेटअप चे पैसे द्यायची गरज नाही. ब्लॉगर एक सब डोमेन सुद्धा देते .blogspot.com चे ज्यावर अडसेन्स सुद्धा लावता येते. हे एकमेव फ्री सब डोमेन आहे त्यावर अडसेन्स लावता येते. 


2) वापरण्यास सोपं-

    ब्लॉगर लोकप्रिय असण्याचे हा एक महत्वाचा फायदा आहे. ब्लॉगर वर ब्लॉग बनवणे, पोस्ट लिहणे, सेटअप करणे, ह्या सर्व प्रक्रिया करणे अत्यंत सोपे आहे. 

   ब्लॉगर वापरल्याने वेळ वाचतो आणि तो वाचवलेला वेळ उत्कृष्ट पोस्ट लिहण्यात वापरता येतो. ब्लॉगर कसे वापरायचे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगवर मिळणार आहे त्यामुळे माझ्या या ब्लॉगवर सतत येत राहा.


3) सुरक्षा- 

    एखाद्याने खूप मेहनत घेऊन ब्लॉग बनवला आणि जर तो ब्लॉग जर हॅक झाला तर! सर्व मेहनत वाया जाते आणि आर्थिक नुकसानसुद्धा होते.

   सुरक्षेच्या बाबतीत ब्लॉगर इतर कोणत्याही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत सर्वोत्तम आहे, याचे कारण असे की ब्लॉगरला पूर्णपणे नियंत्रित करण्याचे काम गुगल करते आणि गुगलची सुरक्षा जगात सर्वोत्तम आहे. ब्लॉगर वापरत असाल तर सुरक्षेची चिंता करण्याची काहीही गरज नाही.


4) कमाई- (Monetization)

    ब्लॉग द्वारे पैसे कमावता येतात ये सर्वांना माहीत झाले असेल. गुगल अडसेन्स च्या जाहिराती ब्लॉगला जोडून पैसे कमावणे ही प्रत्येक ब्लॉगर (ब्लॉगिंग करणारा व्यक्ती) ची इच्छा असते. 

  ब्लॉगर वर यांच्यासाठी खास सुविधा देण्यात आलेली आहे. गुगल अडसेन्स च्या जाहिराती लावण्यासाठी वेगळे पर्याय दिलेले आहेत त्यामुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. 

  ब्लॉगर द्वारे फुकट दिले जाणारे सब डोमेन सुद्धा अडसेन्ससाठी पात्र आहे. त्यावर तुम्ही अडसेन्स च्या जाहिराती जोडू शकता.


5) स्टोरेज आणि बँडविड्थ-

    मी आधीच सांगितले आहे की ब्लॉगर हे संपूर्णपणे फुकट आहे. हे स्टोरेज साठी अतिरिक्त पैसे घेत नाही. गुगल कडून अमर्यादित फ्री स्टोरेज देण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही कितीही पोस्ट लिहू शकता. 

  अमर्यादित स्टोरेज सोबतच अमर्यादित बँडविड्थ सुद्धा ब्लॉगर देते. ब्लॉगर कितीपन ट्रॅफिक हाताळू शकते. तुमच्या ब्लॉगवर रोज 1 हजार ट्रॅफिक असो किंवा 50 हजार, ब्लॉगर ला काहीही फरक नाही पडत. वर्डप्रेस सारखे इतर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म याचे अतिरिक्त पैसे घेतात. 

    थोडक्यात म्हणायचे झाले तर ब्लॉगर हे खूप चांगले ब्लॉगिंग व्यासपीठ आहे. तुम्ही जो ब्लॉग वाचत आहात तो सुद्धा ब्लॉग्जरवरच आहे. 


निष्कर्ष-  

    आता तुम्हाला ब्लॉगर म्हणजे काय आणि हे वापरण्याचे महत्वाचे फायदे समजले असतील. जर तुम्हाला ब्लॉगिंग संबंधित काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे विचारू शकता आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

हे वाचा -

ब्लॉगरमध्ये कस्टम थीम टेम्प्लेट कसे जोडावे - महा माहिती

Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे