Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

On-Page SEO म्हणजे काय आणि हे कसे करावे? - महा माहिती

     ब्लॉगिंग मधला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे SEO. साधारणतः SEO चे दोन प्रकार आहेत त्यातला एक म्हणजे हा On-Page SEO. या लेखमध्ये आपण पाहणार आहोत कि On-Page SEO म्हणजे काय? आणि On-Page SEO कसे करावे? जर तुम्हाला SEO म्हणजे काय? हा लेख वाचायचा असेल तर तुम्ही येथे क्लिक करून पाहू शकता. तर चला वेळ न लावता पाहुयात कि On-Page SEO म्हणजे काय?

On page seo marathi mahiti kase karave

On-Page SEO म्हणजे काय?

     On-Page SEO हा आपल्या ब्लॉगच्या डिजाइन वर निर्धारित असतो. यामुळे ब्लॉगवर भेट देणाऱ्यांची संख्या वाढायला मदत होते. ब्लॉग आकर्षक व सुंदर दिसतो. ब्लॉगसाठी चांगली आकर्षक आणि पटकन लोड होणारी थीम वापरणे, ब्लॉगची लोडींग स्पीड कमी ठेवणे, सुंदर आकर्षक आणि SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट्स लिहणे, image optimization, keyword optimization, हे सर्व घटक या प्रकारात येतात.


On-Page SEO कसे करावे?

१) टायटल टॅग- Title Tag

     टायटल टॅग म्हणजे ब्लॉगचे किंवा ब्लॉग पेजचे शीर्षक. हा जो ब्लॉग तुम्ही वाचत आहात त्याचे शीर्षक आहे "मराठी माहिती ". टायटल टॅग हा एका कीवर्डसारखे काम करतो परंतु हा कीवर्ड नाही हे आहे तुमच्या ब्लॉगचे शीर्षक. जर कोणी गुगल वर मराठी माहिती सर्च केले तर त्यांना हा ब्लॉग दिसेल. ब्लॉगचे टायटल देताना  लक्षात ठेवा कि गुगल सर्च इंजिन हे सर्वसाधारणतः ५० अक्षरापर्यंत टायटल दर्शवतो त्यामुळे टायटल टाकताना ५० अक्षरापर्यंत टाकावे. 

२) मेटा डिस्क्रिपशन- Meta Description

     मेटा डिस्क्रिपशन हे ब्लॉगबद्दल थोडक्यात माहिती असते. मेटा डिस्क्रिपशनचा परिणाम SEO वर सुद्धा पडतो. जर तुम्ही गुगलवर "मराठी माहिती" सर्च केले तर तुम्हाला हा ब्लॉग दिसेल आणि ब्लॉगच्या खाली काही लिहिलेले असेल ते आहे या ब्लॉगचे मेटा डिस्क्रिपशन. मेटा डिस्क्रिपशन हे कीवर्डसारखे कामसुद्धा करते. मेटा डिस्क्रिपशन हे १५० अक्षरांचे असते. ब्लॉगर मध्ये मेटा डिस्क्रिपशन कसे लिहावे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

३) SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट-

     ब्लॉगिंग मधला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा. ब्लॉगची रँकिंग हि लिहलेल्या पोस्टवर बऱ्याच अर्थाने निर्धारित असते. SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्टवर ब्लॉगची ९०% रँकिंग निर्धारित असते. खालील घटकांचा उत्तमरित्या वापर ब्लॉग पोस्टला SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट बनवतात.
  • पोस्टचे शीर्षक 
  • Headings (H1-H6)  
  • उत्तम दर्जाची माहिती - Quality Content
  • सर्च डिस्क्रिपशन 
  • Permalink 
  • Labels

४) Image Optimization-

      Image Optimization हे ब्लॉगच्या लॉंडींग स्पीड वर खूप परिणाम करते. ब्लॉग पोस्टमध्ये इमेज टाकताना आधी साइज बघत जा. इमेज साइज जास्त असल्याने वेबसाईट स्पीड कमी होते त्यामुळे इमेज साइज १००kb च्या जवळ ठेवणे चांगले ठरते. त्याबरोबरच ब्लॉग पेजनुसार इमेज चांगली दिसणे सुद्धा महत्वाचे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो या पेजवर जी सर्वात पाहिली इमेज आहे तिची साइज ६६३*३९८ पिक्सेल अशी आहे. 

५) वेबसाईट स्पीड- Website Speed

     ब्लॉगची रँकिंग वाढवायला वेबसाईट स्पीड हा महत्वाचा भाग असतो. ब्लॉगची लोडींग स्पीड कमीत कमी असली पाहिजे जेणेकरून तुमच्या ब्लॉगवर येणाऱ्यांना जास्त वेळ वाट पाहावा नाही लागली पाहिजे. असे नाही कि लोडींग स्पीडचा प्रभाव फक्त ब्लॉगच्या व्हिजिटर वर पडतो, याचा प्रभाव डायरेक्ट ब्लॉगच्या रँकिंगवर पडतो. गुगल हे व्यक्तीच्या कीवर्डनुसार चांगली माहिती शोधत असते आणि त्यात जास्त लोडींग स्पीड असलेल्या ब्लॉगला मागे ठेवले जाते. अश्या कारणांमुळे SEO साठी वेबसाईट स्पीड अत्यंत महत्वाची ठरते.

६) आकर्षक थीम-

      वरील सर्व घटकांबरोबरच एक चांगली आकर्षक आणि पटकन लोड होणारी ब्लॉग थीम सुद्धा On-Page SEO साठी खूप महत्वाची आहे. ब्लॉग दिसायला चांगला असल्यावर व्हिजिटर्स ला सुद्धा ब्लॉग वाचायला रुची निर्माण होते. दिसायला चांगला असण्यासोबत ब्लॉग पटकन लोड सुद्धा पाहिजे म्हणजे व्हिजिटर्स ला वाट पाहावा नाही लागली पाहिजे. यामुळे ब्लॉगची लोकप्रियता वाढते आणि व्हिजिटर्स पुन्हा-पुन्हा ब्लॉगला भेट देतात.

      On-Page SEO काय आहे? आणि कसे करावे? याबद्दल तुम्हाला आता माहिती मिळाली आहे. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे आम्हाला कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे