JSON Variables

LightBlog

Breaking

LightBlog

Tuesday, 22 June 2021

OTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती

  आजचे युग हे ऑनलाईन शॉपिंग चे आहे. ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करून प्रत्येक जण आपला वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. आज सर्व काही ऑनलाईन आहे. (What is OTP in Marathi)
    पैश्याची देवाणघेवाण करणे, ऑनलाईन वस्तू खरेदी करणे, हे करताना सुरक्षिततेची खूप गरज असते. इंटरनेट ने मानवाचा जेवढा फायदा केला आहे तेवढा तोटा सुद्धा! (OTP in Marathi) ऑनलाईन व्यवहारात खूप काळजी घेण्याची गरज असते. थोडीशी चूक सुद्धा तुमचे बँक खाते खाली करू शकते. 
what is otp in marathi
    आपण कोठेही ऑनलाईन पैसे पाठवताना किंवा कुठे नोंदणी करताना पाहिले असेल की आपल्या मोबाईल नंबर वर एक कोड येतो आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो. आज आपण याच कोड बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
    आजच्या या पोस्टमध्ये आपण OTP म्हणजे काय (otp kya hota hai) आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. OTP चे काही प्रकार आहेत ते सुद्धा आपण पाहुयात आणि शेवटी OTP चा वापर का आणि कोठे केला जातो हे पाहुयात. तर जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

OTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती  

    OTP (One Time Password) हा एकाच वेळेस वापरला जाणारा एक पासवर्ड आहे. या पासवर्ड चा कॉम्पुटर प्रक्रिये ने निर्माण केला जातो आणि नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर पाठवला जातो. हा पासवर्ड हा सांख्यिकी असू शकतो किंवा शाब्दिक किंवा दोन्ही चे मिश्रण सुद्धा असू शकतो. OTP पासवर्ड हा इतर पासवर्ड पेक्षा सुरक्षित असतो. OTP हा संदेश, ई-मेल द्वारे नोंदणी केलेल्या ठिकाणी पाठवला जातो. OTP हा 4 ते 8 कितीही अंकाचा असू शकतो.
    OTP चा लॉंग फॉर्म आहे-"One-Time Password" याला आपण एका वेळेस वापरला जाणारा पासवर्ड सुद्धा म्हणू शकतो कारण याला एकाच वेळा वापरले जाते. हा पासवर्ड पाठवण्याचे उद्दिष्ट असे असते की ज्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलची नोंदणी झालेली आहे तो तुमचाच आहे का हे पडताळणे. जर OTP तुम्ही चुकीचा टाकला तर तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येत नाही आणि याच कारणामुळे OTP इतर पासवर्ड पेक्षा सुरक्षित मानला जातो.

OTP चे प्रकार-

   OTP तीन पद्धतीद्वारे पाठवला जातो आणि यांनाच OTP चे प्रकार म्हणले जातात. तर आता याबद्दल माहिती घेऊयात. 

1) SMS OTP-

   नावातच अर्थ आहे, SMS OTP हा OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल वर संदेश द्वारे पाठवण्यात येतो. SMS OTP चा वापर फोन नंबर पडताळणी साठी केला जातो.

2) Voice Calling OTP- 

    या प्रकारात OTP फोन करून सांगितला जातो. Voice Calling OTP चा वापर फोन नंबर पडताळणी साठी केला जातो.

3) ई-मेल OTP-

     हा OTP तुमच्या ई-मेल द्वारे मिळतो. याचा वापर ई-मेल पडताळणी साठी केला जातो.

OTP चा वापर का केला जातो?

    OTP चा वापर का केला जातो या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण फेसबुक च्या उदाहरणाने पाहुयात- समजा तुम्हाला फेसबुक चे अकाउंट बनवायचे आहे. तुम्हाला तेथे तुमचा फोन नंबर विचारला जातो आणि पुढल्या प्रक्रियेत तुम्हाला OTP विचारला जातो. OTP तुम्हाला संदेश द्वारे मिळतो आणि तुम्ही OTP टाकून पुढली प्रक्रिया करता. 
    आता पहा तुमच्या फोन नंबर चा वापर जर दुसऱ्या कोणाला करायचा असेल. तर तो नोंदणीसाठी तुमचा नंबर टाकेल आणि आणि त्याला OTP विचारला जाईल. पण मोबाईल तर तुमच्याकडे आहे आणि OTP संदेश द्वारे तुमच्या मोबाईल वर येईल आणि त्याला OTP मिळणार नाही पुढील प्रक्रिया तो करूच शकणार नाही.
   तुम्हाला बँक मधून कळले असेल की तुम्ही OTP कुणालाही सांगू नका विचारणारे आम्ही असू किंवा इतर कोणीही. जर तुमचा OTP जर तुम्ही सांगितला तर तुमच्या अकाउंट चा दुरुपयोग होऊ शकतो आणि तुमचे पैसे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढले जाऊ शकतात. OTP चा वापर मोबाईल नंबर किंवा ई-मेल पडताळणी साठी केला जातो, की तो तुमचाच आहे का नाही.


OTP चा वापर कोठे केला जातो?

1) अमेझॉन, फिल्पकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट OTP चा वापर वापरकर्त्यांच्या सुरक्षितते करतात. तुम्ही जर काही खरेदी केले आणि ऑनलाईन पैसे देत असाल तर तेथे तुम्हाला OTP विचारला जातो. आणि OTP जर चुकीचा टाकला तर तुम्हाला पुढली प्रक्रिया करता येत नाही.
2) OTP चा वापर ज्यादा करून जेथे पैस्यांचा व्यवहार होतो तेथे केला जातो. तुम्हाला नेटबँकिंग द्वारे कोणाला पैसे पाठवायचे असेल तर तेथे OTP विचारला जातो.
3) इतर काही वेबसाइट्स आणि अप्स सुद्धा नोंदणी करणासाठी OTP चा वापर करतात.
4) स्कॉलरशिप फॉर्म, बांधकाम कामगार नोंदणी, ऍडमिशन फॉर्म, व इतर सरकारी कामांसाठी सुद्धा OTP चा वापर केला जातो. 
  
   आता तुम्हाला OTP बद्दल पुरेपूर माहिती माहिती (OTP information in Marathi) मिळाली असेल. जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मला कंमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.धन्यवाद!

No comments:

Post a Comment

Adbox