Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे?

    ब्लॉग हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पण तुम्हाला नक्की माहीत आहे का ब्लॉग नेमकं आहे काय? त्यासाठीच तुम्ही इथे आला आहात. ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय असतो? ब्लॉगचे फायदे काय आहेत? जर तुम्ही ब्लॉग बनवण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आपण या पोस्टमध्ये पाहुयात की ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय असतो.
    खूप लोकांना वाटते की स्वतः चा ब्लॉग बनवावा पण माहिती नसल्याने ते मागे पडतात. यासाठीच मी ही माहिती मराठीमध्ये घेऊन आलो आहे. ब्लॉग फुकट मध्ये कसा तयार करावा? हे आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये पाहुयात. त्या आधी आपण ब्लॉग बद्दल माहिती घेऊयात. चला वेळ न लावता पाहुयात की ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे काय? - (What is Blog in Marathi?)

     ब्लॉग हा वेबसाईटचा एक प्रकार आहे. ब्लॉगमध्ये मजकूर (content) उलट कालक्रमानुसार सादर केला जातो म्हणजे नवीन मजकूर प्रथम दिसतो. सोशल मीडियावर जसे नवीन पोस्ट प्रथम दिसतात तसेच ब्लॉगमध्ये असते. ब्लॉगमध्ये लिहलेल्या मजकुराला किंवा सामग्रीला ब्लॉग पोस्ट असे संबोधले जाते. नवीन लिहलेली ब्लॉग पोस्ट सर्वात वरती दिसते. तुम्ही उदाहरणासाठी माझा ब्लॉग पहा जी पोस्ट नवीन लिहलेली आहे ती सर्वात वरती दिसेल.
blog mhanje kaya, difference between blog and website in marathi, what is blog in marathi
    ब्लॉग एका व्यक्तीकडून चालवला जातो किंवा ग्रुप मध्ये सुद्धा चालवला जातो. जर ब्लॉग हा बातम्यांचा असेल तर एकट्याला चालवणे खूप अवघड असते त्यासाठी ग्रुप बनवावा लागतोच. काही ब्लॉगमध्ये कंमेंट करण्यासाठी सुद्धा पर्याय दिलेला असतो त्यात तुम्ही तुमचे मत मांडू शकता. सध्या इंटरनेट वर खूप ब्लॉग आहेत आणि ते खूप उत्कृष्ट माहिती प्रदान करतात. ब्लॉगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इंटरनेट वरचे ब्लॉग पाहणे खूप चांगले राहील.

ब्लॉगचा इतिहास -(History of Blogs in Marathi)

    इंटरनेट चा शोध १९६० मध्ये लागला. पुढे त्यात प्रगती होत गेली. डायरी लिहायची प्रथा पूर्वीपासून चालत आहे.  इंटरनेट आल्यावर काही लोक इंटरनेट वर ऑनलाईन डायरी किंवा जर्नल्स लिहायला लागले. ऑनलाईन डायऱ्या पुढे हळू हळू लोकप्रिय होईला लागल्या आणि ऑनलाईन डायरी ऐवजी 'web blog' हा शब्द पहिल्यांदा 90 च्या दशकाच्या शेवटी वापरला गेला आणि त्याचा नंतर 'weblog' पुढे 'we blog' आणि शेवटी 'blog' हा शब्द तयार झाला.
    ब्लॉगच्या वाढत्या लोकप्रियतेला आणि संख्येला पाहून 1999 मध्ये ब्लॉग बनवायचे एक साधनबनवले गेले ते म्हणजे ब्लॉगजर.कॉम (Blogger.com). फेब्रुवारी 2003 मध्ये गुगल कंपनीने ब्लॉगर ला आपल्या मालकीचे बनवले. ब्लॉगरमुळे ब्लॉगला एक वेगळीच दिशा मिळाली. त्याच वर्षी मे 2003 मध्ये वर्डप्रेस हे साधन आले. आता वर्डप्रेस हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग व्यासपीठ झाले आहे. 

ब्लॉग आणि वेबसाईटमधील फरक- (Difference Between Blog and Website in Marathi)

   तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय हे वरती कळाले असेल. ब्लॉगला पूर्णपणे समजण्यासाठी ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय वेगळे असते हि माहिती झाले पाहिजे. ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काही फरक असतात ते खालीलप्रमाणे-
     1) ब्लॉग आणि वेबसाईट मधील सर्वात मोठा फरक म्हणजे ब्लॉगमध्ये सतत नवीन नवीन माहितीचा भर घातला जातो आणि ही माहिती उलट कालक्रमानुसार दर्शवली जाते, म्हणजे जी पोस्ट नवीन असेल ती वरती दिसते. वेबसाईटमध्ये असे नसते. 
     2) ब्लॉगमध्ये पोस्ट च्या स्वरूपात माहिती लिहावी लागते जसे फेसबुक वर पोस्ट असते तशीच. वेबसाईट मध्ये सगळे वेगळे असते. वेबसाईटमध्ये आपल्याला गरजेनुसार बदल करता येतात. 
     3) वेबसाईट ही स्थिर स्वरूपाची असते आणि वेबसाईट मधील माहिती ही पेजेस च्या रुपात असते. ब्लॉग मध्ये माहिती ही पोस्टच्या स्वरूपात असते आणि सतत नवीन नवीन पोस्ट टाकाव्या लागतात. ब्लॉगमध्ये सुद्धा काही पेजेस टाकावे लागतात जसे contact us, about us, terms and conditios. हे पेज टाकणे गरजेचे असते.

ब्लॉगचे फायदे-(The benefits of a blog)

1) ब्लॉग लिहिल्याने लेखनकौशल्य विकसित होते.
2) ब्लॉग द्वारे आपले ज्ञान, आपले विचार संपूर्ण जगापर्यंत पोहोचवता येतात आणि त्याद्वारे आपण पैसे कमाऊ शकतो.
4) ब्लॉग बनवून तुम्ही इंटरनेट क्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता. तुम्ही फेमस होऊ शकता.
5) इंटरनेट वरचे ब्लॉग वाचून तुम्ही नवीन नवीन माहिती घेऊ शकता. आणि तुमच्याकडची माहिती खूप लोकांपर्यंत पोहचवू शकता. 

     ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉगचा इतिहास, ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय आहे? ब्लॉग चे फायदे काय आहेत. यांबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती मिळालीच असेल. तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत पाठवणे विसरू नका आणि तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. अजून या विषयावर खूप साऱ्या माहितीसाठी माझ्या ब्लॉगला वारंवार भेट देत रहा. धन्यवाद!
हे वाचा- 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे